esakal | तरुणाने संपवले आयुष्य; आई, पत्नी, तीन मुलींचा आधार हरपला

बोलून बातमी शोधा

null

तरुणाने संपवले आयुष्य; आई, पत्नी, तीन मुलींचा आधार हरपला

sakal_logo
By
श्रीधर पाटील

बाजारसावंगी (जि.औरंगाबाद) : बाजारसावंगी (ता.खुलताबाद) येथील शेतवस्तीवर पत्र्यांच्या शेडमधील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने तरुणाने शुक्रवारी (ता.30) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. दादाराव जनार्धन नलावडे ( वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादाराव नलावडे हा शेतकरी व मोलमजुरी करत होता. घटनेची माहिती वस्ती शेजारचे आसाराम नलावडे यांनी सकाळी गावातील संजय नलावडे यांना दिली. त्यांनी लगेच बाजारसावंगीच्या पोलिस चौकीला खबर दिल्यावरून सकाळीच मुख्य जमादार संजय जगताप व नवनाथ कोल्हे, जमादार योगेश नाडे, संतोष पुंड, पोलिस पाटील कारभारी नरवडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला.

हेही वाचा: वाळूजजवळ तरुण धक्कादायक अवस्थेत आढळला, क्षुल्लक कारण बेतले जीवावर

सकाळीच सात वाजता बाजारसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दादाराव नलावडे यांना हलवण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.पी. महेर यांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी दहा वाजता येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. अल्पशेतीसह मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवला जातो. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे हे करीत आहेत.