Aurangabad: भाऊबीज करून परतणाऱ्या भाचीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

औरंगाबाद : भाऊबीज करून परतणाऱ्या भाचीचा मृत्यू

लासूर स्टेशन : दुचाकी, टाटा पिकअपच्या अपघातात भाचीचा मृत्यू झाला तर मामा जखमी झाल्याची घटना लासूर स्टेशन येथील सावंगी चौकाजवळ रविवारी सकाळी ९. ३० च्या सुमारास घडली.

दृष्टी (खुशी) नितीन खेडकर (वय ७) मृत बालिकेचे नाव आहे. तर प्रशांत नवनाथ गलांडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुट्टेवाडगाव (ता.गंगापूर) येथील स्वाती खेडकर भाऊबीजेला सातवर्षीय मुलगी दृष्टीसह रायपूर येथे माहेरी गेल्या होत्या. भावाला ओवळून त्या बुट्टेवाडगावला सासरी येण्यासाठी निघाल्या असता भावाने दुचाकीवर सोडतो सांगत भाऊ प्रशांत भाची दृष्टी व बहीण स्वाती यांना रायपूरहून दुचाकीवर (एमएच-२०, एफडब्ल्यू-४१५३) घेऊन सकाळी नऊ वाजता बुट्टेवाडगावकडे रवाना झाले.

हेही वाचा: T20 WC : भारताच्या जावायाच्या जोरावर स्कॉटलंडसमोरही पाकिस्तानचा थाट

दरम्यान, लासूर स्टेशन ओलांडून सावंगी चौकातून गंगापूर रस्त्याने पुढे निघाल्यानंतर दत्त मंदिराजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा पिकअपचा धक्का लागून दुचाकीवरील मामा, भाची, बहीण खाली पडले. यात दृष्टीचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांतच्या पायाला जबर मार लागला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नागरिकांनी जखमींना सावंगी येथील शिवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर मृत बालिकेचे लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातानंतर महामार्ग सुरक्षा पोलिस बलाचे पोलिस उपनिरीक्षक आलमगीर शेख पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल ढाकणे करत आहेत.

Web Title: Aurangabad Diwali Sister Accident Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top