esakal | औरंगाबादेत शिक्षण विभाग राबविणार ‘थँक्स अ टिचर’ अभियान
sakal

बोलून बातमी शोधा

THANKS TO TEACHAR 1.png

औरंगाबादेत शिक्षण विभाग राबविणार ‘थँक्स अ टिचर’ अभियान

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपुर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त २०२०-२१ मध्ये थँक्स अ टिचर अभियान राबविले होते. यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठीथँक्स अ टिचर अभियानाअंतर्गत शिक्षकांचे कार्य गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

हेही वाचा: संततधार पावसामुळे पैठणमधील पाचोडसह परिसरातील पिके पाण्याखाली

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होवून जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. कोरोनामुळे शाळा बंद आहेत, या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले. दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जावून, समुह मार्गदर्शन वर्ग घेतले. अशा शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाकडून २ ते पाच सप्टेंबर या कालावधीत ‘थॅक्स अ टिचर’ अभियानाअंतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावे, या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन-ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजाचा सक्रीय सहभाग असावा, असे पत्र महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी जारी केले आहे.

हेही वाचा: नांदेडमध्ये नदीच्या पुरात दोन जण वाहून गेले

स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव :

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन-ऑफलाईन राबविण्यात आलेल्या स्पर्धेचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यमांवर फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मिडियावर #ThankATeacher, #ThankYouTeacher, #MyFavouriteTeacher, #MyTeacherMyHero, #ThankATeacher२०२१ हॅशटॅग करुन अपलोड करावेत. यामधील सर्वोत्तम कार्यक्रमांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषदे (एससीईआरटी) कडून जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर कोरोना परीस्थिती शिथिल झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

तीन गटात होणार स्पर्धा

शिक्षक दिनानिमित्त ‘थॅक्स अ टिचर’ अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य, गौरव प्रित्यर्थ पहिली ते पाचवीसाठी ‘माझा आवडता शिक्षक’, ‘शिक्षक दिन’, ‘मी शिक्षक झालो तर...’, सहावी ते आठवीसाठी ‘माझा शिक्षक माझा प्रेरक’, ‘कोविड कालावधीतील शिक्षकांची भूमिका’, ‘माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान’, ‘उपक्रमशिल शिक्षक’, आणि नववी ते बारावीच्या गटासाठी ‘आधुनिक काळातमध्ये शिक्षकांची बदलेली भूमिका’, ‘देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान’, ‘शिक्षक-समाज परीवर्तनाचे माध्यम’, ‘माझ्या शिक्षकाचा नावीन्यपुर्ण उपक्रम’ याविषयांवर विद्यार्थ्यांनी निबंध, वत्कृत्व, काव्य, चित्र रेखाटन करायचे आहे.

loading image
go to top