विवाहितेला लग्नाचा तगादा लावत पतीला 2 दिवस ठेवले डांबून!

सुखरूप सुटका : पत्नीची औरंगाबाद गाठत पोलिसांत धाव
crime
crimeesakal

औरंगाबाद : विवाहित मैत्रिणीला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत तिच्याच पतीचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी संशयित मित्राविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १९ जूनला सायंकाळी घडली. दत्ता नाथाप्रसाद पवार (२३, रा. पांगरकरनगर, घर क्र. ९, जालना) असे आरोपी मित्राचे नाव आहे. अपहरण करणाऱ्या मित्राचे वय २३ तर ज्यांचे अपहरण केले त्यांचे ४८ वर्षे वय आहे हे विशेष!

या प्रकरणातील दोघे पती-पत्नी मुळचे नांदेड जिल्ह्यातील असून ते बीड बायपास परिसरात राहतात. आरोपी दत्ता हा विवाहितेचा मित्र आहे. त्यामुळे तिच्या पतीचीही त्याच्याशी मैत्री होतीच. दरम्यान विवाहिता भावाचे लग्न असल्याने मुलासह गावी गेल्या होत्या, त्यावेळी पती घरी एकटेच असल्याने पत्नीच्या पार्लरचे सामान शिफ्टिंग करत होते. त्यावेळी कॉलनीतच राहणारा पत्नीचा मित्र दत्ता हा त्यांच्याकडे आला आणि टपरीवर चहा घेऊ, मला तुझ्याशी तुझ्या पत्नीसंदर्भात बोलायचे आहे म्हणत त्यांना दुचाकीवर (एचएच- २०, डीवाय ६९९५) घेऊन नंदिनी हॉटेलच्या पाठीमागे नेले.

तिथे एका घरासमोर दुचाकी थांबवण्यास सांगितले. तिथे आधीपासून बंद असलेल्या खोलीचा दरवाजा उघडत महिलेच्या पतीला जबरदस्तीने नेले. दरम्यान ओरडशील तर खानदान संपवून टाकीन अशी धमकी दिल्याने विवाहितेचा पती भीतीपोटी शांत बसला.

मला तुझ्याशी लग्न करायचंय आताच ये...

पतीला डांबून ठेवत आरोपी दत्ताने त्यांच्या फोनवरून त्यांच्या पत्नीला वारंवार फोन लावत ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू आत्ताच मला भेटायला ये, नाही आल्यास तुझ्या पतीला ठार मारून टाकीन’ अशी धमकी दिली. तसेच तुझी पत्नी आली नाही तर तुला कटरने कापून टाकीन अशी धमकी त्यांना दिली. दरम्यान विवाहितेने तातडीने औरंगाबाद गाठून पोलिसांकडे मदत मागितल्याने २१ जूनला सायंकाळी पोलिसांनी पतीची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी आरोपी दत्ताविरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक शिरसाठ करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com