Aurangabad school News | औरंगाबाद आजपासून आठवी, नववी, अकरावीचे वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad school News

औरंगाबाद आजपासून आठवी, नववी, अकरावीचे वर्ग

औरंगाबाद : कोरोना संसर्ग वाढताच बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. मनपा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दहावी, बारावीचे वर्ग भरविण्यास परवानगी दिली होती. आता मनपा हद्दीतील शासकीयसह खासगी शाळांमधील आठवी, नववी व अकरावीचे वर्ग अटी-शर्थीच्या अधीन राहून सोमवारपासून (ता.३१) भरविण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने रविवारी (ता.३०) शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी केली होती. (Aurangabad school News)

हेही वाचा: Punjab Election: १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषीवरून घाणेरडे राजकारण; केजरीवाल

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, अवघ्या काही दिवसांतच ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या व इतर व्यवहार सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे पालकांमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. दरम्यान महापालिका प्रशासकांनी १० व १२ वीचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता आठवी, नववी व ११ वीचे वर्ग भरविण्यास सोमवारपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार रविवारी शाळांना सुटी असूनही शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेची साफसफाई, सॅनिटायझेशनचे कामे सुरू होती.

हेही वाचा: Budget 2022 : शेअर मार्केट : अर्थसंकल्पाचा अवघड पेपर!

या सूचनांचे पालन आवश्‍यक

मनपा प्रशासनाने शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतरांसोबत झालेल्या चर्चेनुसार महापालिका हद्दीतील फक्त इयत्ता आठवी, नववी व अकरावीचे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून अटी व शर्थीच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता दिली. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीचा पर्याय निवडला आहे, त्या विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहनचालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी लसीचे दोन्हीही डोस घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शाळेत टप्प्या-टप्प्याने तसेच एक दिवस आड बोलविण्यात यावे, असे म्हटले आहे.

हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी

आरटीपीसीआर बंधनकारक

शाळा सुरू करण्यापूर्वी ४८ तासांपूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी कोरोनामुक्त झाल्यावरच शाळेत उपस्थित राहावे, असे प्रशासकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Aurangabad From Today School Opne Eighth Ninth And Eleventh Class

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top