गौताळा अभयारण्यात आज वन्यप्राणी गणना

सतरा बिटवर व्यवस्था : वन्यजीव कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
Aurangabad Gautala Sanctuary conducting wildlife census
Aurangabad Gautala Sanctuary conducting wildlife censussakal

कन्नड : जैवविविधतेने मराठवाड्यातील सर्वात समृध्द असलेल्या गौताळा औट्रमघाट अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी प्रगणना करण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी चार ते मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत सतरा पाणस्थळांच्या बिटवर ही प्रगणना करण्यात येणार आहे, अशी माहिती वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल राहुल शेळके यांनी दिली.

गौताळा अभयारण्यात मे महिन्यातील बौद्ध पौर्णिमेला या संधीचा फायदा घेऊन वन्य प्राणी प्रगणना करण्यात येते. निरभ्र आकाश, स्वच्छ चंद्र प्रकाश आणि पाणगळ यामुळे वन्यप्राणी सहज न्याहाळता येतात. हौशी निसर्ग, वन्यजीव प्रेमीही या प्रगणनेत सहभागी होऊ शकतात. त्यासाठी वन्यजीव विभागाचे विभागीय कार्यालय औरंगाबाद येथून पूर्व नोंदणी करून परवानगी घ्यावी लागते. या वर्षी २२ वन्य प्रेमींनी अर्ज केला होता. त्यांना परवानगी दिली आहे. मर्यादित बिट असल्याने सर्वात आधी येणाऱ्यास प्रथम प्राधान्यानुसार ही परवानगी देण्यात आली आहे.

गौताळा अभयारण्य मराठवाडा, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील सीमेवर २६१ चौ.कि.मी क्षेत्रफळावर विस्तारलेले आहे. या अभयारण्यात पट्टेवाला वाघ, बिबटे, अस्वल, निलगायी, हरणे, कोल्हा, लांडगा, रानडुकरे आदी विविध वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. १६ रोजी दुपारी तीन वाजता वन्यजीव प्रगणकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्राणी गणणेसाठी येताना भडक कपडे परिधान करू नये तसेच कोणतेही सुवासिक अत्तर वापरू नये, आवाज, गोंगाट करू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे श्री.शेळके यांनी सांगितले. संदीप मोरे, पोपट बोर्डे, के. व्ही. रायसिंग, पी. जे. पारधी, मनोज उदार हे पाच वनपाल वन्यप्राणी प्रगणनेसाठी सहभागी होणार आहेत.

असे असेल वन्य प्राणी प्रगणनेसाठी बिट

नागद वनपरिक्षेत्र भिलदरी क्रमांक एक, २.सायगव्हाण पूर्व, कन्नड वनपरिक्षेत्र :मोहरडा-पाणवठा १, पाणवठा २, ब्राम्हणी पाणवठा, अंबाला, हिवरखेडा, चाळीसगाव :जावळीचा नाला, कृत्रिम पाणवठा कक्ष, तलाव कक्ष, धरण आदी ठिकाणी वन्यजीव प्रगणना होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com