औरंगाबाद : दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात!

गौताळ्यात वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, निसर्गप्रेमींनी व्यक्त केली नाराजी
Aurangabad Gautala Sanctuary forest department
Aurangabad Gautala Sanctuary forest department

औरंगाबाद : मोजक्याच शिल्लक राहिलेल्या समृद्ध जंगलांपैकी एक असलेल्या गौताळा अभयारण्यातील जैवविविधता धोक्यात आली असून मोकाट जनावरे, वनस्पतींचा चोरटा व्यापार, बेशिस्त पर्यटक याकडे वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुर्मिळ वनसंपदा लोप पावत आहे. वनविभागाचे अपुरे मनुष्यबळ आणि पर्यावरणाविषयी जागरूकता नसल्याने निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

मानद वन्यजीव रक्षक किशोर पाठक व वनस्पती अभ्यासक व संवर्धक मिलिंद गिरधारी यांनी नुकत्याच केलेल्या गौताळा अभयारण्य अभ्यास दौऱ्यात दीपकाडी, देवकंद, कंदीलपुष्प, रानसुरण, मुसळ कर्णफूल, अर्कपुष्पी, भुईचक्र या दुर्मिळ वनस्पती आढळून आल्या आहेत. यातील दीपकाडी तर काससारख्या जग प्रसिद्ध पठारावरही आढळून येते.

या वनस्पती गवताळ पट्ट्यात असतात, मात्र पर्यटक आपली वाहने थेट गवताळ माळरानावर पार्क करीत तेथेच पाट्या आणि नासधुशीच्या प्रकारामुळे वनस्पतींचे नुकसान होत आहे. गौताळ्यात अनेक ठिकाणी प्लॅस्टिक आणि कचरा दिसून येत आहे.

पर्यटकांच्या अशा बेशिस्त वर्तनामुळे या वनस्पती अक्षरशः पायदळी तुडवल्या जात आहे. या वनस्पती चालू मोसमातच फळधारणा करून बीजप्रसार करतात तसेच प्रसारित झालेले बीज लगेच अंकुरित होऊन नवी रोपे तयार होतात. या पद्धतीने त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवतात मात्र त्यांचे जर पायदळी तुडवून नुकसान झाले, तर त्यांची फळधारणा होत नाही.

वनस्पती संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे

लगतच्या गावातील लोक आपली जनावरे या गवताळ पट्ट्यांवर मोकाट चरायला सोडून देत आहेत. त्यामुळे येथील वनस्पती जीवन अधिकच धोक्यात आले आहे. वनविभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून वनविभागाकडून जेथे दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन कार्य अपेक्षित आहे. तेथे त्यांचे संरक्षण करत नसल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गौताळ्यातील दुर्मिळ वनस्पती पुढच्या पिढीला दिसावे असे वाटत असेल तर या ठिकाणी वनविभागाने उपद्रवी पर्यटक, गुरेचराई, गवतकटाई बंद करीत येथे पेट्रोलिंग वाढवणे गरजेचे आहे. अभयारण्य क्षेत्रात झकास पठार, ट्रेकिंग प्रोग्रामसाठी नियमावली बनवावी

- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक

गौताळा अभयारण्यात दुर्मिळ वनस्पती आहे. त्यांचे संवर्धन होणे गरजचे आहे. तेव्हाच या जंगलातील जैवविविधता सुरक्षित राहील.

-मिलिंद गिरधारी, वनस्पती अभ्यासक व संवर्धक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com