औरंगाबाद : गुरु नानकदेवजी जयंती शहरात उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : गुरु नानकदेवजी जयंती शहरात उत्साहात

औरंगाबाद : गुरु नानकदेवजी जयंती शहरात उत्साहात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद ः उस्मानपुरा येथील गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभामध्ये गुरु नानकदेवजी यांची जयंती (प्रकाश पर्व) उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. हजारो नागरिकांनी गुरुग्रंथ साहिब समोर माथा टेकून दर्शन घेतले. उपस्थितांनी ‘जो बोले सो निहाल, सतश्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह’ चा जयघोष केला.

भाई खडकसिंग यांनी गुरु नानकदेवजी यांच्या जीवनावर कथा सादर केली. दिल्ली येथील भाई परमिंदरसिंग यांनी ‘जीते मेरा सतगुरु बैठा, तेरे सेवक को भऊ किछ नाही जमु नही आवै नेरेचे सादरीकरण केले. गुरुद्वारामध्ये सकाळपासून दर्शनासाठी रांगा होत्या. यावेळी खासदार इम्तियाज जलील, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, माजी महापौर गजानन बारवाल, अशोक सायन्ना यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली.

गुरुद्वारा मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी रक्तदान केले. गुरुद्वारा भाई दया सिंग भाई धरमसिंगचे कोषाध्यक्ष सरदार हरिसिंग, सहसचिव रणजीत मलिक, सदस्य इंदरपाल सिंग बिंद्रा, सिमरन कौर बिंद्रा, सदस्य परविंदर सिंग कौशल, मनबीर सिंग, सरदार प्रीतम सिंग, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन ओबेरॉय, गुरुद्वारा दु:ख निवारण साहिबचे सदस्य राजा सिंग कौशल, तारासिंग पन्नू, हरचरण मुच्छल, रवींद्रसिंग मुच्छल, हरचरणसिंग गुलाटी, दलजीतसिंग छाबडा यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

लंगरची व्यवस्था

भूपेंद्रसिंग राजपाल यांच्यातर्फे लंगरची सेवा दिली गेली. त्यांचा गुरुद्वारा प्रबंधक समितीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी हरविंदर सिंग बिंद्रा, गुरुद्वारा उपाध्यक्ष जसपाल सिंग ओबेरॉय, सचिव कुलदीप सिंग नीर, कोषाध्यक्ष इंदरजीत सिंग छतवाल, प्रबंधक परविंदरसिंग सहगल, प्रीतपाल सिंग ग्रंथी यांची उपस्थिती होती.

loading image
go to top