Hatnur Toll Plaza: हतनूर टोल अखेर सुरू, स्थानिकांना 275 मासिक टोल

kannad toll plaza
kannad toll plaza

कन्नड (औरंगाबाद): संघर्ष समितीच्या मागण्या पूर्ण न करत गुरुवारी(ता.17) अखेर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड जवळील हतनूर येथील बहुचर्चित टोल सुरू झाला. या टोलवर टोल परिसरातील 20 किलोमीटर अंतराच्या आतील रहिवासी प्रवाशांना 275 मासिक टोल पास मिळणार आहे.
दरम्यान महामार्गावरील सर्व त्रुटी दूर करण्याचे आश्वासन महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक तथा प्रकल्प अधिकारी अरविंद काळे यांनी दिले आहे.

महामार्गावरील त्रुटी व उपाय:- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरगावहून देवगावकडे जातांना, बोरगावहून टाकळीकडे जाताना, औरंगाबादहून कन्नडकडे येताना सेवा ढाब्याजवळ व अंधानेरहून कन्नडकडे येताना या चार ठिकाणी सर्वाधिक अपघात होत आहेत. डॉ.आण्णा शिंदे, डॉ.सदाशिव पाटील, अशोक दापकेसह  महामार्ग संघर्ष समितीने यावर उपाय सुचविले आहेत. त्यानुसार बोरगावहून देवगाव व टाकळी व अंधानेरहून कन्नड येण्यासाठी दोन ठिकाणी भुयारी मार्ग आवश्यक आहे. तसेच औरंगाबादहून कन्नडला येताना सेवा ढाब्याजवळ सर्वाधिक अपघात झाले आहेत.

याठिकाणी संघर्ष समितीने सुचवल्याप्रमाणे सेवा ढाब्या जवळील कन्नड औरंगाबादहून कन्नड प्रवेश पॉईंट बंद करण्यात यावा. पाणपोई पुलापासून सेवा धाब्याजवळील कन्नड कडे प्रवेश घेण्यात येतो तिथ पर्यंत पूर्वेकडून सर्व्हिस रोड करण्याचे काम करावे. यामुळे औरंगाबादहून तसेच चापानेर, वैजापूरकडून येणारे प्रवाशी पाणपोई पुलाखालून सुरक्षित रित्या कन्नडकडे येऊ शकतील. तसेच एखादा प्रवासी चुकीन पुलावरून पुढे आला तर त्याला सेवा ढाब्या जवळ कन्नड कडे प्रवेश मिळणार नाही, त्याऐवजी त्याला रेल पुलाखालून मकरंद पूर मार्गे कन्नड कडे येण्याची सुरक्षित सोय होईल. या उपाययोजनामुळे या ठिकाणी अपघाताना आळा बसेल.

स्थानिकांना मोफत पास द्यावा:- नाशिक -पुणे हा महामार्ग धुळे सोलापूर महामार्गाच्या समकालीन महामार्ग आहे. त्या महामार्गाच्या संगमनेर जवळील टोल वर स्थानिकांना केवळ आधार कार्ड दाखवल्यावर टोल वरून पुढे जाऊ दिले जाते. तसेच सिन्नर, संगमनेरसह अनेक ठिकाणी महामार्गावर गतिरोधक आहेत. तसेच मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक ते धुळे दरम्यान अनेक ठिकाणी गतिरोधक आहेत.

त्याप्रमाणे धुळे सोलापूर महामार्गावर स्थानिकांना मासिक टोल रद्द करून केवळ आधार कार्ड दाखवून टोल वरून जाऊ द्यावे,तसेच अंधानेर ब बोरगाव येथे भुयारी मार्ग होई पर्यंत गतिरोधक करण्यात यावे अशी संघर्ष समितीची भूमिका आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्व राष्ट्रासाठी एकच कार्यालय असून सर्वीकडे नियम सारखा असणे अपेक्षित आहे.मात्र इकडे स्थानिकांना प्रत्येक महिन्याला 275 रुपयांचा खर्च करावा लागत आहे.हा कन्नड कारांवर अन्याय आहे.पश्चिम महाराष्ट्रातील नेते सक्षम आहेत म्हणून तेथे स्थानिकांना टोल नाही व इकडे स्थानिकांना टोल भरावा लागतो हा अन्याय सहन केला जाणार नाही.

टोल प्लाझा पासून 20 किलोमीटर परिघातील नागरिकांना 275 रुपयात मासिक पास मिळणार आहे.पास देण्यासाठी टोल प्लाझावर चार काउंटर लावलेले आहेत.अटीत बसत असलेल्या स्थानिकांनी आपल्या गाडीचे आर.सी.व आधार कार्ड दिल्यावर त्यांना मासिक पास दिला जाईल.

-अरविंद काळे (महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापक तथा प्रकल्प अधिकारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com