औरंगाबाद : खंडपीठ वकील संघाच्या अध्यक्षपदी नितीन चौधरी

सचिवपदी ॲड. सुहास उरगुंडे यांची बिनविरोध निवड
Aurangabad high court
Aurangabad high court

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या कार्यकारिणीची निवडणूक शुक्रवारी पार पडली. निवडणुकीत अध्यक्ष म्हणून ॲड. नितीन चौधरी तर सचिव म्हणून ॲड. सुहास उरगुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खंडपीठ वकील संघाची कार्यकारिणी एक वर्षाच्या कालावधीसाठी निवडण्यात येते. अध्यक्ष आणि सचिवपदासाठी एकमेव ॲड. नितीन चौधरी व ॲड. सुहास उरगुंडे यांचे अर्ज असल्याने त्यांना विजयी घोषित केले आहे. वकील संघाच्या पुरुष उपाध्यक्ष, महिला सहसचिव, लायब्ररी कमिटी चेअरमन आणि सदस्य पदासाठी मतदान झाले. विद्यमान खंडपीठ वकील संघाने वकिलांच्या चेंबरचा प्रश्न मार्गी लावला, त्यामुळे अध्यक्ष व सचिव यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.

उर्वरित कार्यकारिणी अशी :

उपाध्यक्ष (महिला) ॲड. निमा सूर्यवंशी, सहसचिव (महिला) ॲड. शुभांगी मोरे, सहसचिव ॲड. चैतन्य देशपांडे, खजिनदार ॲड. दयानंद भालके, ग्रंथालय समिती अध्यक्ष ॲड. बाळासाहेब मगर, सचिव ॲड. प्रदीप तांबडे, महिला सदस्य ॲड. नयना पाटील, ॲड. प्रियांका शिंदे, सदस्य ॲड. राकेश ब्राह्मणकर, ॲड. देवदत्त देशमुख, ॲड. वैभव देशमुख, ॲड. रवी खांडेभराड, ॲड. राहुल पाटील, ॲड. कृष्णा रोडगे, ॲड. संकेत शिंदे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com