Aurangabad : अश्लील व्हिडिओ प्रकरणी अखेर 'किर्तनकार बाबा' ला अटक

किर्तनकार महाराजाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
Kirtankar Maharaj Viral Video And Aurangabad News
Kirtankar Maharaj Viral Video And Aurangabad Newsesakal

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद जिल्ह्यातील किर्तनकार महाराजाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदरील महिला ही किर्तनकार आहे. या घटनेने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. मंगळवारी (ता.१९) रात्री अखेर या रंगेल महाराजाला शिल्लेगाव (ता.गंगापूर) पोलिसांनी अटक केली. गंगापूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महाराजास जामीन मंजूर केला. (Aurangabad Kirtankar Maharaj Viral Video Maharaj Arrested)

Kirtankar Maharaj Viral Video And Aurangabad News
अखेर दुसऱ्या भावाचाही मृत्यू, दोन्ही मुले गेल्याने आईला अश्रू अनावर

गेली अनेक वर्षे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या या महाराजाचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ ९ एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली होती. हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून किर्तन करतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्सवर आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला असून संतापाची लाट उसळली. या किर्तनकार महाराजाचा (Kirtankar Maharaj) व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडिओमध्ये असलेल्या किर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Kirtankar Maharaj Viral Video And Aurangabad News
Aurangabad | बेदम मारहाणीत युवकाचा मृत्यू, बाप-लेकाला पोलिसांनी पकडले

या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली होती. अखेर मंगळवारी पोलिसांनी या महाराजाला ताब्यात घेतले. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे बदनामी झाल्याने महिला किर्तनकाराने घाबरून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. औरंगाबाद (Aurangabad) येथील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले होते. या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमान सातपुते हे तपास करित आहेत

Kirtankar Maharaj Viral Video And Aurangabad News
चीन लवकरच तैवानवर करु शकतो हल्ला !रशियावर बीजिंगचे लक्ष

गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले कीर्तनकार आणि महिला कीर्तनकार या अश्लील व्हिडिओ क्लिपमध्ये नको त्या अवस्थेमध्ये दिसले आहेत. सदरील व्हिडिओ हा महाराजांनी स्वत:च चित्रित केल्याचेही या चित्रफितीमध्ये पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे दोन व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. सदरील व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणारी महिला ही देखील किर्तनकार आहे. ती ज्या परिसरात राहते त्या परिसरात अनेक लोक तिला मानतात. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. तर दोघांचे युट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com