अखेर दुसऱ्या भावाचाही मृत्यू, दोन्ही मुले गेल्याने आईला अश्रू अनावर

दोन्ही सख्ख्या भावांच्या मृत्युने दोन्ही भावांचे कुटुंब उघड्यावर
Aurangabad Accident News
Aurangabad Accident Newsesakal

आडुळ (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद येथे दुचाकीने गवंडी कामासाठी जात असताना रविवारी (ता.१७) बीड बाह्यवळण रस्त्यावरील सहारा सिटीसमोर गॅसच्या पाईपलाईनचे काम करीत असलेला क्रेन व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक गवंडी कामगार जागीच ठार झाला होता. तर त्याचा सख्खा मोठा भाऊ व आणखीन एक जण गंभीर जखमी झाले होते. रविवारपासून त्यांच्यावर औरंगाबाद (Aurangabad) येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या शिवाजी नागरे यांचा मंगळवारी (ता.१९) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी सकाळी वैजीनाथ तातेराव नागरे (वय ३०) व त्यांचे मोठे बंधु शिवाजी तातेराव नागरे (वय ३७) हे व गावातील तिसरे कामगार नामदेव सुदाम गायकवाड (वय ४३, तिघे रा. काद्राबाद, ता.औरंगाबाद) हे रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने (एमएच २० एफझेड ३४७०) औरंगाबाद येथे गवंडी काम करण्यासाठी जात होते. (Finally Second Brother Died, Mother Not Digest Sudden Death Of Two Sons Aurangabad)

Aurangabad Accident News
सर्वात पहिले निवडणुकीच्या प्रचाराचे भोंगे बंद करा : बच्चू कडू

दुचाकी बाह्यवळण रस्त्यावरील सहारा सिटीजवळ येत क्रेनची त्यांच्या दुचाकीला धडक लागली. यात वैजीनाथ नागरे यांचा जागीच मृत्यू झाला,तर त्यांचे मोठे बंधू शिवाजी नागरे व नामदेव गायकवाड हे गंभीर जखमी झाले. आज सकाळी उपचारादरम्यान शिवाजी नागरे यांचा देखील मृत्यू झाला. मृत वैजीनाथ यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. शिवाजी नागरे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. या अपघाताची नोंद एमआयडीसी (MIDC) चिकलठाणा पोलीस ठाण्यात घेण्यात आली.

एक भाऊ मृत, तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज ही अपयशी

या घटनेत दुचाकीस्वार दोघे जण संख्खे भाऊ होते. यातील वैजीनाथ नागरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांचे मोठे बंधू शिवाजी नागरे हे गंभीर जखमी होते. अखेर आज शिवाजी नागरे यांची देखील उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

Aurangabad Accident News
टोपेंच्या आरोपाला अब्दुल सत्तारांचे उत्तर; म्हणाले...

दोन्ही मुले गेल्या आईला अश्रू अनावर

दोन्ही मुलांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या आई आसराबाई नागरे यांना अश्रू अनावर झाले होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने वैजीनाथ नागरे यांच्या पत्नी शंकुनतलाबाई व शिवाजी नागरे यांच्या पत्नी रंजनाबाई नागरे यांनी मृतदेह बघुन हंबरडा फोडला. यावेळी गावातील नागरिक सुन्न होऊन शोक व्यक्त करीत होते. दोन्ही सख्ख्या भावांच्या मृत्युने दोन्ही भावांचे कुटुंब उघड्यावर आल्याने शासनाने या दोन्ही कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची सोय करुन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com