तब्बल एक हजार रुग्ण घरीच, कमी खाटांमुळे दिली होम आयसोलेशनची सुविधा

Aurangabad Latest News
Aurangabad Latest News

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची शहरात झपाट्याने वाढ होत असल्याने आता कोविड केअर सेंटर कमी पडत आहेत. त्यामुळे ज्यांना कोरोनाची तिव्र लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा रुग्णांची संख्या ९६६ एवढी आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने कोविड केअर सेंटरच्या संख्येत वाढ केली. पण रुग्णांची संख्या एवढ्या झपाट्याने वाढेल हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. सध्या शहरात नऊ कोवीड केअर सेंटर सुरू आहेत. त्यात १८०० रुग्णांची क्षमता आहे तर खासगी रुग्णालयात सुमारे १३०० बेडची सुविधा आहे. तसेच घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयातही कोरोनाच्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

पण दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महापालिकेचे कोवीड केअर सेंटर, घाटी रुग्णालय आणि जिल्हा सामान्य, खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे बेड मिळविण्यासाठी गंभीर रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने आता सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा दिली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या ९६६ रुग्ण घरी उपचार घेत असल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


पाच हजार रुग्णांवर उपचार सुरू
सध्या महापालिका हद्दीत पाच हजार ४५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ३००, जिल्हा सामान्य रुग्णालयात २८१, ईएसआयसी हॉस्पीटलमध्ये ९०, एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे कोवीड केअर सेंटरमध्ये ८९, एमआयटी बॉईज हॉस्टेलमध्ये ३१०, किले अर्क हॉस्टेलमध्ये २९५, पदमपुरा कोवीड केअर सेंटरमध्ये ६८, सीएसएसएम कॉलेजमध्ये ९८, सिपेट कोवीड केअर सेंटरमध्ये २७८, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात २६०, पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये १८० रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ९६६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com