esakal | Break the Chain: औरंगाबादेत ‘इन आऊट’ करायचे तर ई पास हवाच!

बोलून बातमी शोधा

covid pass

Break the Chain: औरंगाबादेत ‘इन आऊट’ करायचे तर ई पास हवाच!

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: शहरात येण्यासाठी तसेच शहराबाहेर जाण्यासाठी आता ई- पास आवश्‍यक असेल. २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने राज्य सरकारने आंतरजिल्हा, आंतरराज्य प्रवासबंदी केली आहे. त्यामुळे ई- पास शिवाय औरंगाबाद शहरात इन- आऊट करता येणार नाही असे स्पष्ट आदेश पोलिस विभागातर्फे जारी करण्यात आले आहेत.

ई- पाससुद्धा अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी देण्यात येईल. अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी ई- पासची आवश्यकता नसणार आहे.

हेही वाचा: मेडिकलमध्ये औषधांशिवाय इतर साहित्य विकल्यास होणार कारवाई

ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या ई - पाससाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आवश्‍यक कारणांसाठी ई पास मिळण्यास अडचणी आल्यास संबंधितांनी आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ई-पास मिळवता येईल असेही विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक बनकर यांनी कळविले आहे.

पोलिस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ एकचे उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील आणि परिमंडळ दोन दोनचे उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या कार्यक्षेत्रात उपनिरीक्षकाच्या अधिपत्याखाली दोन्ही परिमंडळात दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तांत्रिक माहितीसाठी ०२४०-२२ ४०५०३ आणि २२४०५९४ यावर संपर्क करता येणार आहे.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू

ई- पास मिळविण्यासाठी हे करा-

ई - पास मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. या संकेतस्थळावर क्लिक केल्यास Apply for New Pass वर जाऊन Apply for Pass Here यावर क्लिक करा. त्यानंतर Travel Pass या नावाने नविन विंडो ओपन होईल. त्यानंतर कोठून कोठे जायचे, किती दिवस प्रवास करावयाचा आहे, यासारखी प्राथमिक माहिती भरल्यानंतर टोकन क्रमांक प्राप्त होईल. त्यानंतर Check Status/Download Pass यावर क्लिक करुन टोकन क्रमांक टाकल्यानंतर ई- पास डाऊनलोड करता येणार आहे.

ई- पाससाठी नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कोणतेही एक ओळखपत्र आणि पासपोर्ट फोटो आदि प्राथमिक माहिती गरजेची असून प्रवास करताना सोबत असणाऱ्या सहप्रवाशाचीही माहिती नमूद करणे आवश्‍यक आहे.