Coronavirus| कंन्टेनमेंट झोनची जबाबदारी आता सोसायटींच्या अध्यक्षावर

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने शहरातील २६ भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत
containment zone
containment zonecontainment zone

औरंगाबाद: कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने शहरातील २६ भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. यातील मायक्रो कंन्टेनमेंट झोनमधील जबाबदारी आता गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष व सचिवांवर टाकली जाणार आहे. सोसायटीमध्ये जास्तीत जास्त चाचण्या, लसीकरण करून घेणे व पॉझिटिव्ह आलेल्यांची माहिती महापालिकेला कळविणे बंधनकारक राहणार आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले की, शहरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने कंन्टेनमेंट झोन जाहीर केले आहेत. ते तीन प्रकारचे आहेत. मायक्रो, मीडिअम व लार्ज असे तीन प्रकारचे कंन्टेनमेंट झोन आहेत. यातील मायक्रो कंन्टेनमेंट झोनमधील संसर्ग कमी करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे. अर्पाटमेंट, टाऊनशिपमधील २० टक्के नागरिक पॉझिटिव्ह आल्याने हे भाग कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सोसायटी अध्यक्ष व सचिवांवर अर्पाटमेंटमध्ये जास्तीत जास्त चाचण्या करून घेणे, लसीकरण करणे अशा जबाबदाऱ्या टाकल्या जाणार आहेत. चाचण्यांनंतर कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची माहिती महापालिकेला कळवावी लागेल.

स्वंयसेवकांनी समोर यावे-

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कंन्टेनमेंट झोनमधील स्वयंसेवकांनी समोर यावे, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले. त्या भागातील लोकांचा सहभाग असेल तर साथ नियंत्रणात येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआरसीटी नको-

पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक जण एचआरसीटी टेस्ट करत आहेत. याबाबत केंद्रीय पथकाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआरसीटी चाचणी करू नये, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.

रेमडेसिव्हरचा मुबलक साठा -

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हर इंजेक्शनचा शहरात मुबलक साठा आहे. आणखी इंजेक्‍शनची खरेदी केली जात आहे. तसेच ॲन्टीजेन पद्धतीच्या तीन लाख तर आरटीपीसीआर पद्धतीच्या ६० हजार कोरोना चाचणी कीट उपलब्ध असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com