esakal | सिल्लोडमध्ये कोरोनाच्या लसीचा तुटवडा, लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी

बोलून बातमी शोधा

सिल्लोडमध्ये कोरोनाच्या लसीचा तुटवडा, लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी
सिल्लोडमध्ये कोरोनाच्या लसीचा तुटवडा, लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी
sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नियम धाब्यावर ठेवत उपजिल्हा रूग्णालयात नागरिक गर्दी करित आहेत. त्यामुळे ज्या कारणासाठी लस घ्यायची आहे. ती परिस्थिती नागरिक उपजिल्हा रूग्णालयात गर्दी करून निर्माण करू लागले आहे. लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. गेल्या आठवड्यात लसीचा साठा संपल्यामुळे आठ दिवस लसीकरण बंद होते. आता कमी अधिक प्रमाणात लस उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक लस घेण्यासाठी सकाळी नऊ वाजेपासूनच उपजिल्हा रूग्णालयात गर्दी करू लागले आहे.

हेही वाचा: खासदार जलील रुग्णांच्या मदतीला, घाटीला चार हजार सलाईनच्या बॉटल्स दिल्या भेट

रूग्णालय प्रशासनाच्या वतीने लसीकरणाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजनाच करण्यात येत नसल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवित नागरिक लोटालाटी करित असल्याचे चित्र दररोज रूग्णालयात पाहावयास मिळत आहे. गर्दीमुळे नागरिक स्वत: च्या आरोग्यासह रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील वेठीस धरत असल्याचा प्रकार घडत आहे. लसीकरण करण्यासाठी रूग्णालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.