१ हजार ५६ मतदार निवडणार २० संचालक; औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत दिवसेंदिवस भरतेय रंगत

Aurangabad district bank voting list
Aurangabad district bank voting list

औरंगाबाद: जिल्हा बँकेच्या २० संचालक मंडळाच्या जागांसाठी २१ मार्चला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ५६ मतदार या वीस संचालकांची निवड करणार आहेत. या निवडणुकीत बिगरशेतीच्या पाच जागांसाठी निर्णायक ठरणार आहेत. चिन्ह वाटप झाल्यानंतर सर्वजण जोमाने कामाला लागले आहेत. दोन्ही पॅनलतर्फे प्रत्येक मतदाराशी प्रत्यक्ष तसेच फोन वरून संपर्क साधने सुरु आहे.

सर्व लोकप्रतिनिधी, मंत्र्यांनीही मतदारांकडे फिल्डिंग लावत आहेत. केवळ सहा दिवसच मतदानाला बाकी आहेत. बिगरशेती मतदारसंघात बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, अभिजित देशमुख यांचा सामना जगन्नाथ काळे, रवींद्र काळे, रंगनाथ काळे, रंगनाथ कोलते, जे. के. जाधव आणि दिलीप बनकर यांच्याशी होणार आहे.

या मतदारसंघात पाच जागा असून ३३५ मतदार असल्याने विजयी होणाऱ्या उमेदवारास किमान ५० ते ६० मते घ्यावी लागणार आहेत. यासह पैठण तालुका सोसायटी मतदारसंघातून रोहयोमंत्री संदीपान भुमरे व खुलताबाद तालुक्यातून किरण डोणगावकर हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत.

औरंगाबाद तालुका सोसायटी मतदारसंघात जावेद पटेल आणि अंकुश शेळके, सोयगाव तालुक्यात रंगनाथ काळे आणि सुरेखा काळे, सिल्लोड मतदारसंघात अर्जुन गाढे आणि विष्णू जांभूळकर, फुलंब्री मतदारसंघात सुहास शिरसाट आणि पुंडलिक जंगले, कन्नड मतदारसंघात अशोक मगर आणि मनोज राठोड यांच्यात दुरंगी लढत होईल. गंगापूर तालुक्यात शेषराव जाधव, कृष्णा डोणगावकर, जयराम साळुंके तसेच वैजापूर तालुक्यात अप्पासाहेब पाटील, ज्ञानेश्वर जगताप आणि दत्तात्रय धुमाळ यांच्यात तिरंगी लढत होईल. 

औरंगाबाद तालुका ७३ 
सिल्लोड ८४ 
सोयगाव ३६ 
खुलताबाद २७
पैठण ८६ 
कन्नड १००
वैजापूर ११५
फुलंब्री ६१
बिगरशेती मतदारसंघ ३३५
१० कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया ४० 
११ गंगापूर ९९
  एकूण १०५६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com