esakal | मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून शेतकरी ठार, दोन दिवसांनी उघडकीस आली घटना
sakal

बोलून बातमी शोधा

वाळूज (जि.औरंगाबाद) - मातीचा ढिगारा उकरताना जेसीबी यंत्र.

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून शेतकरी ठार, दोन दिवसांनी उघडकीस आली घटना

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : नदी खोलीकरणातून निघालेली माती स्वतःच्या शेतात टाकत असताना मातीच्या ढिगाराखाली दबून ४५ वर्षीय शेतकरी ठार झाला. दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना रविवारी (ता.२) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वाळूज परिसरातील अंबेलोहळ ते वडगाव (रामपुरी) दरम्यान नागझरी नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. या खोलीकरणातून निघालेली माती स्वतःच्या शेतात टाकत असताना अर्जुन शांतीलाल बोऱ्हाडे (वय ४५, रा. वडगाव, रामपुरी) हा शेतकरी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला. घटनेनंतर माती टाकणारा चालक वाहनासह फरार झाला.

हेही वाचा: घरी जाताना गरोदर महिलेचा वेदनादायी मृत्यू, वीज अंगावर कोसळून शेवट

दोन-तीन दिवसांपासून अर्जुन बोऱ्हाडे हा घरी न आल्याने त्याचा शोध सुरू झाला. शेवटी संशय आल्याने जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा उकरून पाहिला असता त्याखाली अर्जुन बोऱ्हाडे यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी धनराज राठोड यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक काकासाहेब जगदाळे करीत आहेत.

loading image