esakal | 'रेमडेसिविर'चा काळाबाजार करणाऱ्यांना रस्त्यावर नेऊन मारू - इम्तियाज जलील

बोलून बातमी शोधा

null

'रेमडेसिविर'चा काळाबाजार करणाऱ्यांना रस्त्यावर नेऊन मारू - इम्तियाज जलील

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : शहरात वेगवेगळ्या रुग्णालयातून विशेष करून घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी होत असल्याच्या माहिती व बातम्या समोर येत आहेत, अशा कठीण काळात इंजेक्शनचे काळाबाजार करणाऱ्यांची माहिती आम्हाला द्या. त्याला रस्त्यावर नेऊन मारू अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (ता.२६) एका स्थानिक माध्यमाला बोलताना दिली.

हेही वाचा: ऑक्सिजनअभावी पैठण एमआयडीसीमधील कंपनी बंद, कामगारांवर उपासमारीची वेळ

श्री.जलील म्हणाले, की शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यात येत आहे. त्यासाठी काही लोक व काही मेडिकलचालकांतर्फे हे करण्यात येत आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो की, अशा प्रकारे कोणी इंजेक्शनचा काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती आम्हाला द्या. आम्ही त्याला पकडून रस्त्यावर नेऊन मारू. मी स्वतः बुटाने मारण्यास सुरुवात करील. त्यानंतर सगळ्या लोकांना त्याला मारण्यास सांगेल. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ असेही जलील म्हणाले. आता परिस्थिती ही खूप गंभीर आहे. त्यामुळे या काळात अशा प्रकारे पैसे कमावणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी हे आम्ही करू. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केले आहे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.