esakal | रेमडेसिविर जीवरक्षक नव्हे, मार्गदर्शक तत्त्वानुसारच करा वापर

बोलून बातमी शोधा

remdesivir
रेमडेसिविर जीवरक्षक नव्हे, मार्गदर्शक तत्त्वानुसारच करा वापर
sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : केवळ रेमडेसिविर हे जीवरक्षक औषध नसून ते फक्त कोरोनाबाधित रुग्णाचा (Corona Positive Patient) रुग्णालयातील कालावधी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर रेमडेसिविरचा (Remdesivir Injection) वापर राज्य टास्क फोर्स समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (District Collector Sunil Chavan) यांनी जिल्ह्यातील विविध डॉक्टरांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्ष येथे झालेल्या कोरोना टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत दिले. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Asikkumar Pandey), अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपायुक्त जगदीश मनियार व अन्य अधिकाऱ्यांसह घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर (Kanan Yelikar), डॉ. आनंद निकाळजे, डॉ.ज्योती बजाज यांच्यासह सदस्य व आरोग्य विभागातील विविध शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Aurangabad Latest News Remdesivir Not Life Saver, Use Guidelines)

हेही वाचा: ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणा देत भाजपचे औरंगाबादेत निषेध आंदोलन

यावेळी रेमडेसिविर हे जीवनरक्षक औषध नसून ते फक्त कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत आग्रह धरु नये, अशा सूचना या बैठकी दरम्यान करण्यात आल्या. त्याचबरोबर रेमडिसीवीर वापराबाबत जनतेचा अट्टहास आणि काही गैरसमज आहेत. याला प्रतिबंध होण्यासाठी वैद्यकीय व आरोग्य यंत्रणांनी राज्य टास्क फोर्सच्या समितीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रुग्णांना रेमडेसिविर निर्देशित करावे. गरज नसताना रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यात येऊ नये. रेमडेसिविरची अनधिकृत विक्री, औषधाचा साठा याबाबत संबंधित यंत्रणेने आपली जबाबदारी पार पाडावी.

हेही वाचा: औरंगाबादेत १६ मेपासून हेल्मेट सक्ती, खंडपीठाने खडसावल्यानंतर पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’

रुग्णांच्या प्रतिकारशक्ती वाढीचे उपचार वाढावेत

कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे रुग्णांच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासंदर्भातील उपचार वाढवण्याची आता गरज असल्याचे मत डॉ. आनंद निकाळजे यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केले. तर, अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अपवादात्मक परिस्थितीत संदिग्ध आला किंवा रुग्णांस कोरोनाची लक्षणे आहेत. पण अहवाल निगेटिव्ह आला असेल तर या परिस्थितीत निदानासाठी सीटी स्कॅन चाचणी उपयोगी पडते. यासाठी रेमडेसिविर वापरण्याची गरज नसून रुग्णाची लक्षणे, प्रतिकारशक्ती, परिस्थितीनुसार औषधोपचार घेण्याची गरज असते, असे मतही मांडले. याबरोबरच डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ.ज्योती बजाज यांच्यासह अन्य तज्ज्ञ उपस्थित होते.