esakal | व्हेंटीलेटर्स दुरूस्त झाले अन् काही वेळातच पुन्हा बिघडले!
sakal

बोलून बातमी शोधा

व्हेंटिलेटर

व्हेंटीलेटर्स दुरूस्त झाले अन् काही वेळातच पुन्हा बिघडले!

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : घाटीला (Ghati Hospital) मिळालेल्या व्हेंटीलेटर्सपैकी (Ventilators) चार दुरूस्त झाले आणि बिघडल्याचे समोर आले. त्यामुळे तंत्रज्ञांनी या व्हेंटीलेटर्सची सेटींग बदलण्याचा निर्णय घेतला व दुरूस्तीला पुन्हा सुरूवात केल्याची माहिती (Aurangabad) घाटी प्रशासनातर्फे देण्यात आली. घाटीला दिलेल्या दोन टप्प्यातील व्हेंटीलेटर्सचा दर्जा खालावलेला असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्याअनुषंगाने तंत्रज्ञाची पथकेही घाटीत आली. मात्र, ज्योती सीएनसीच्या (Jyoti CNC) अभियंत्यांच्या पडताळणीनुसार, रुग्णाला ऑक्सिजन मास्क योग्य न लावल्यामुळे ऑक्सिजन गळती होत असल्याचा दावा केला होता. परंतू, व्हेंटीलेटर्स कार्य करीत नसल्याने पुन्हा दुरूस्ती झाली. मात्र, काही वेळानंतर पुन्ही ते बिघडल्याचे समोर आले. त्यानंतर आता या व्हेंटीलेटर्सची सेटींग बदलली जात आहे. सेटींग बदलल्यानंतर व्हेंटीलेटरचे योग्य कार्य होणे अपेक्षित आहे, असेही घाटीकडून सांगण्यात आले. (Aurangabad Latest News Repaired Ventilators Again Unfit)

हेही वाचा: भाजपकडून नितीन गडकरींच्या सल्ल्याला केराची टोपली

व्हेंटीलेटर्सबाबत आतापर्यंतच्या घडामोडी

- भारतातील उत्पादकांना ‘मेक इन इंडिया’अंतर्गत व्हेंटीलेटर्स निर्मिती करण्यासाठी ऑर्डर दिली.

- ऑर्डर दिलेल्या अनेक कंपन्या पहिल्यांदाच व्हेंटीलेटर्सचे उत्पादन करणाऱ्या होत्या.

- याच कंपन्यांद्वारा ‘मेक इन इंडिया’ (Make In India) अंतर्गत निर्मित व्हेंटीलेटर्स औरंगाबाद जिल्ह्यात पाठविले.

व्हेंटीलेटर्सचा पहिला टप्पा

- मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत उत्पादक कंपनी ज्योती ‘सीएनसी’ने तयार केलेले व्हेंटीलेटर्स घाटीत पाठविले.

- घाटी रुग्णालयात १५० व्हेंटीलेटर्सचा पुरवठा, त्यात १९ एप्रिलला १०० व्हेंटीलेटर्सची पहिली खेप शहरात.

- पहिल्या खेपेत १०० पैकी ४५ व्हेंटीलेटर्स घाटीत बसविले.

व्हेंटीलेटर्सचा दुसरा टप्पा

- ५० व्हेंटीलेटर्सचा दुसरा टप्पा २३ एप्रिलला घाटीत पाठविला.

- त्यापैकी केवळ दोन व्हेंटीलेटर्स खासगी रुगणालयात बसवण्यात आले.

- इतर ४८ व्हेंटीलेटर्स सध्या घाटीत पॅकबंद. ते बसवण्याविषयीच्या सूचनेची ज्योती ‘सीएनसी’ व एचएलसी कंपनीला प्रतीक्षा.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात मी घाटी रुग्णालयाला ‘पीएम केअर’ फंडातून दिलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे निघाल्याचे सांगत राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीवर व संबंधित अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने गुन्हा दाखल करावा, आदी विविध मागण्या बैठकीत केल्या.

- सतीश चव्हाण, आमदार