'कोरोनाची तिसरी लाटही रोखणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! एकाच कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची लागण

'कोरोनाची तिसरी लाटही रोखणार'

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची (Corona Second Wave) दुसरी लाट शहरात नियंत्रणात असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असल्याचा दावा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी गुरुवारी (ता. सहा) केला. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी चाचण्या व लसीकरणावर भर देण्यात आला आहे. त्याला नगरसेवक व नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. यामुळे संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे श्री. पांडेय यांनी यावेळी नमूद केले. कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) पार्श्‍वभूमीवर श्री. पांडेय यांनी गुरूवारी शहरातील लोकप्रतिनिधींसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीचे आयोजन केले होते. (Aurangabad Latest News Third Wave Of Covid Will Prevent)

हेही वाचा: लॉकडाउन संपल्यानंतर बीडला पहिला मोर्चा, आरक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलन

त्यात माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, गजानन बारवाल, माजी उपमहापौर राजू शिंदे, प्रमोद राठोड, विजय औताडे, राजेंद्र जंजाळ, भाऊसाहेब जगताप, मनोज गांगवे, जयश्री कुलकर्णी, गंगाधर ढगे यांनी यांनी सहभाग नोंदवला. यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा करण्यात आली. माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवकांनी संवाद साधताना पांडेय यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांविषयी आयुक्त पांडेय यांनी माहिती दिली. प्रशासन आता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. खासगी रूग्णालयाच्या मदतीने ऑक्सिजन क्षमता वाढविण्याचे काम केले. पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये दोन ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी बेड वाढवण्यासाठी गरवारे कंपनीने शेड दिले. वॉररूम रुग्णवाहिका व्यवस्थापन, बेड मॅनेजमेंट, हॉस्पिटल डिस्चार्ज मॅनेजमेंट आणि हेल्थ माझ्या हाती मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून बेडची उपलब्धता करून देण्यात येत आहे, असे प्रशासकांनी सांगितले.

हेही वाचा: औरंगाबादेत आज फक्त १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण

सर्वाधिक लसीकरण औरंगाबादेत

महाराष्ट्र सर्वाधिक लसीकरण झालेले शहर म्हणून औरंगाबाद शहराचे नाव अग्रेसर आहे, असे श्री. पांडेय यांनी सांगितले. आजवर शहरात दोन लाख ४४ हजार नागरिकांना लस देण्यात आली. आता नागरिकांचा प्रतिसाद वाढला असला तरी लस कमी पडत आहे. मे महिन्यात लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्तीत लस घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.

बेड वाढवा, रेमडेसिविर खरेदी करा

माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी श्री. पांडेय यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरसह सर्व प्रकारचे बेड्स व लसीकरण केंद्र वाढवण्यात यावे, रेमडेसिविर खरेदी करा, गॅस शवदाहिनी सुरु करा, शासकीय योजनांचे फलक प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावावा, अशा सूचना केल्या. माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची शक्यता असल्याने बालकोविड व्यवस्थापन करावे, अशी सूचना केली.

Web Title: Aurangabad Latest News Third Wave Of Covid Will

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top