जिल्‍हा बँकेच्या १८ जांगासाठी आज मतदान; राज्यमंत्र्यांसह आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Aurangabad district bank voting list.
Aurangabad district bank voting list.

औरंगाबाद: जिल्हा बँकेच्या १८ जागांसाठी रविवारी (ता.२१) मतदान होणार आहे. या निवडणुकीत ४८ उमेदवार रिंगणात असून १ हजार ११ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदा शेतकरी विकास पॅनल आणि शेतकरी सहकारी बँक विकास पॅनेलमध्ये थेट निवडणूक होणार आहेत. यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्ह्यात दहा ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होणार आहे. कृषी पतपुरवठा कार्यकारी सोसायटी ८ जागा, कृषी पणन- १, बिगर शेती संस्था-५, महिला सदस्य-२, अनुसुचित जाती जमाती- १, इतर मागासवर्गीय-१, विमुक्त जाती अनुसुचित जमाती सदस्य- १,वैयक्तिक जागा १ अशा एकुण २१ जागा आहेत. यातील वैयक्तिकची जागा रिक्त राहिली आहे. तसेच पैठण सोसायटी मतदारसंघातून कॅबीनेटमंत्री भुमरे आणि खुलताबाद मतदारसंघातून किरण पाटील डोणगावकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

या निवडणूकीत बिगर शेतीमधून आमदार हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, अभिजीत देशमुख, नितीन पाटील यांच्या विरोधात जगन्नाथ काळे, रविंद्र काळे, एकनाथ जाधव आणि दिलीप बनकर यांच्यात चुरस दिसून येत आहे. तर कृषी पणन शेतमाल प्रक्रीयेतून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात प्रकाशचंद्र मुथा, महिला सदस्यात मंदाबाई माने, मंगल वाहेगावकर यांच्याविरोधात पार्वताबाई जाधव आणि सुरेखा बोडखे यासह चार अपक्ष महिलांही रिंगणात असल्याने यात मोठी चुरस रहील.

कोरोनाग्रस्तांसाठी विशेष वेळ 
कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दुपारी साडेतीन ते चार हा वेळ देण्यात आला आहेत. केंद्रावर पीपीई किट घालून मतदान करता येईल. 

एकुण जागा - २० 
बिनविरोध  २ 
एकूण - १८ जागासांठी निवडणूकी 
एकूण मतदार - १,११४ 
 

या ठिकाणी मतदान- औरंगाबाद- विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कार्यालय, क्रांती चौक 
फुलंब्री- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दरी रोड 
सिल्लोड- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था 
पैठण- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था 
खुलताबाद-सहाय्यक निबंधक सहकारी संस्था 
सोयगांव- बचत भवन, पंचायत समिती 
कन्नड- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था 
गंगापूर- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था 
वैजापूर- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com