esakal | कोरोना लसीकरणासाठी तरुणांच्या रांगा, ज्येष्ठ घरातच

बोलून बातमी शोधा

कोरोना लसीकरणासाठी तरुणांच्या रांगा, ज्येष्ठ घरातच
कोरोना लसीकरणासाठी तरुणांच्या रांगा, ज्येष्ठ घरातच
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आता ४५ वर्षीय नागरिकांची गर्दी होत असून, ६० वर्षांवरील ज्येष्ठांचा मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे. ४५ वर्षांवरील सुमारे ६० हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. केंद्र सरकारने देशात कोरोना संसर्गाची लाट रोखण्यासाठी संशोधना अंती कोरोना लस नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. देशभरात एक एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने पाच एप्रिलपासून जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यासोबतच व्यापारी, बँक कर्मचारी, कामगारांना लसीकरण केले जात आहे. दोन आठवड्यात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बुधवारपर्यंत (ता. २१) ४५ ते ५९ वर्षांवरील ५९,२९५ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ४९ हजार ७६१ ज्येष्ठांनीच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. लस वेळेवर मिळत नसल्याने लसीकरणावर परिणाम होत आहे. मंगळवारी लसीचा साठा संपल्यामुळे बुधवारची मोहीम बारगळण्याच्या मार्गावर होती. पण १५ हजार लसी काल प्राप्त झाल्याने संकट टळले. हा साठा दोनच दिवस पुरणार आहे.

हेही वाचा: मराठवाडा हादरला...कोरोनाचे १६६ बळी, वाढले सात हजार ८०० कोरोनाबाधित

आजवर झालेले लसीकरण

- आरोग्य कर्मचारी :

पहिला डोस - २६,९१०

दुसरा डोस - ११,३४९

- फ्रंटलाइन वर्कर्स :

पहिला डोस - २६,२६०

दुसरा डोस - ४,५९३

- ४५ ते ५९ वयोगट :

पहिला डोस - ५९,२९५

दुसरा डोस - ३,४५६

- ६० वर्षांवरील ज्येष्ठ :

पहिला डोस - ४९,७६१

दुसरा डोस - ६,७३३

एकूण लसीकरण - १,८८,३५६.