मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरच दुकाने सुरु होणार, व्यापारी महासंघाची भूमिका

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

औरंगाबाद : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात सर्व काही बंद ठेवल्यास लॉकडाउन केल्यास पाठिंबा दर्शविला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका रविवारी (ता.११) येणे अपेक्षित होते. मात्र, ती न आल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरच दुकाने सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. व्यापारी महासंघातर्फे रविवारी सकाळी त्यांच्याशी संलग्नित असलेल्या ७२ संघटनांच्या पदाधिकाऱ्या सोबत ऑनलाईन बैठक झाली.

श्री.काळे म्हणाले, शहरात आठ दिवसानंतर पाणी येते. आठ दिवस पाहण्यासाठी आपण थांबू शकतो तर पूर्णपणे लॉकडाउन लावल्यानंतर मेडिकल सोडता इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी आपण थांबू शकत नाही का? असा प्रश्नही काळे यांनी उपस्थित केला.

औषधी दुकाने सोडता सर्व जीवनावश्यक वस्तू बंद ठेवल्यावरच आम्ही सरकारच्या लॉकडाऊननला पाठिंबा देऊ अन्यथा आम्ही उद्या दुकाने उघडून असा निर्णय सकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांकडून दुकाने सुरु ठेवण्याबाबत उत्तर आलेले नाही. त्यांनी वेळ वाढवून मागितल्यामूळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर दुकान सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेतले जाणार असल्याचेही श्री.काळे यांनी सांगितले. 

 
संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue
woman farmer success story
Nashik Ahilyanagar Akkalkot Surat Chennai highway land acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com