Aurangabad : महापालिकेतील १९ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

सफाई कामगारांसोबतच तीन कंत्राटी स्वच्छता निरीक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
औरंगाबाद महापालिका
औरंगाबाद महापालिकाsakal

औरंगाबाद : महापालिकेत दांडीबहाद्दर व लेटलतिफ कर्मचाऱ्यांची मोठी संख्या आहे. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अशा कर्मचाऱ्यांवर पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना देवूनही गैरहजर राहणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश सोमवारी काढण्यात आले. दोन कर्मचारी कंत्राटी तर १९ कर्मचारी महापालिकेच्या आस्थापनेवरील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेत मुख्यालयासह प्रभाग कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर असतात. त्यामुळे डॉ. चौधरी यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आदेश दिले होते. कायम गैरहजर राहणाऱ्यांना नोटीसही देण्यात आली होती. विशेष म्हणजे नऊ झोन कार्यालयातील अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले. सोमवारी याचा अहवाल डॉ. चौधरी यांनी मागविला व कायम गैरहजर राहणाऱ्या १९ कायम तर दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यातील बहुतांश कर्मचारी हे वर्ग चारचे आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

सफाई कामगारांसोबतच तीन कंत्राटी स्वच्छता निरीक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय दैनिक वेतनावरील दोन कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्याचे आदेश आयुक्त चौधरी यांनी दिले आहेत. दरम्यान, सूचना करुनही अतिक्रमण काढण्यात दिरंगाई केल्याबद्दल आयुक्त डॉ. चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवींद्र निकम यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com