औरंगाबाद : महापालिका खरेदी करणार सॅटेलाईट फोन

पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार
Aurangabad Municipal Corporation buy satellite phones
Aurangabad Municipal Corporation buy satellite phonessakal

औरंगाबाद : पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. अतिवृष्टीने फोन, मोबाईल बंद पडण्याची शक्यता गृहित धरून सॅटेलाईट फोन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शहरातील नाल्यांची सफाई केली आहे. त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात जलजन्य व किटजन्य आजार पसरू नयेत यासाठी २४ तास साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. साथरोग नियंत्रणासाठी मुख्य भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. एक केंद्रीय पथक व ४० रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत.

नागरिकांना तातडीने संदेश देण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या स्क्रीनचा वापर केला जाईल. अग्निशमन दलाचा २४ तास नियंत्रण कक्ष, शोध व बचाव पथक तयार करण्यात आले आहे.

तीन पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. ट्रेलर पंप व पोर्टेबल पंप पाण्याचा उपसा करण्यासाठी सर्व वॉर्ड कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास शहरातील समाजमंदिरे, शाळा, नाट्यगृहे, मंगल कार्यालयांची यादी तयार करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com