औरंगाबाद महापालिका मुख्यालयात लागली आग

शॉर्ट सर्किटमुळे दोन कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का
Aurangabad Municipal Corporation headquarters Fire
Aurangabad Municipal Corporation headquarters Firesakal

औरंगाबाद : शहरात लागलेल्या आगी आटोक्यात आणण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या मुख्यालयातच बुधवारी आग लागली. अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या कक्षाजवळ अचानक शॉर्ट सर्किटमुळे होऊन आग भडकली. दोन कर्मचाऱ्यांना शॉक लागल्याने एकच धावपळ उडाली. परिसरातील फायर सेफ्टी यंत्रणा आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

महापालिका मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावर अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांचे दालन आहे. दालनाबाहेर कर्मचारी काम करतात. दुपारी दोन वाजेच्या सुमारास याठिकाणी आग लागली. शॉर्ट सर्किट होताच उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. सर्वत्र धूर झाल्याने काही कर्मचाऱ्यांनी लाईनमनला बोलावून त्वरित इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर आयुक्त कार्यालयातील फायर सेफ्टी सिलिंडर आणून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री नेमाने दालनातच बसून होते. आग आटोक्यात आल्यानंतर त्यांनी पाहणी केली. दरम्यान काहींनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. पंधरा मिनिटात अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले पण तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.

फिटींगसाठी दर्जाहीन साहित्य

महापालिकेत वारंवार विविध कक्षांची कामे केली जात आहेत. मात्र १९८२ मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीमधील लाइट फिटींग आजही जशास तशी आहे. काही कामे करण्यात आली पण कंत्राटदारांकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केल्या. चायना मेड साहित्य वापरल्याने शॉट सर्किटचे प्रकार वाढल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com