esakal | बिहार पॅटर्नमुळे महापालिका निवडणुकीच्या आशा पल्लवीत 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad amc news

बिहार राज्याची विधानसभा निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने काही अटी-शर्तींच्या आधारे परवानगी दिली आहे. बिहार राज्याबद्दल निघालेले आदेश महाराष्ट्राला देखील लागू होतील असे गृहीत धरले जात आहे.

बिहार पॅटर्नमुळे महापालिका निवडणुकीच्या आशा पल्लवीत 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद ः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र आता बिहारच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली तयार केली आहे. याच धर्तीवर राज्य निवडणूक आयोगानाने काही निर्णय घेतल्यास औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूका देखील होऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाचे डोळे मात्र मुंबईहून काय आदेश येतील याकडे लागले आहे. 

महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार होती. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने संपूर्ण तयारीही केली. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच देशभरातील सर्वच निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या. असे असतानाच बिहार राज्याची विधानसभा निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने काही अटी-शर्तींच्या आधारे परवानगी दिली आहे.

हेही वाचा- मालमत्ताधारकांकडे थकले 385 कोटी

बिहार राज्याबद्दल निघालेले आदेश महाराष्ट्राला देखील लागू होतील असे गृहीत धरले जात आहे. त्यानुसार महापालिकेला निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून काही आदेश येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. सोमवारी आदेश येतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता, पण दिवसभर आयोगाच्या कार्यालयातून कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे उत्सुकता लांबणीवर पडली आहे. 

खर्च वाढण्याची शक्यता 
बिहारप्रमाणे उपाय-योजना करून औरंगाबाद महापालिकेची निवडणूक घेण्याचे आदेश प्राप्त झाले तरी निवडणूकीसाठी लागणाऱ्या खर्चात मात्र प्रचंड वाढ होणार आहे. कारण कोरोनापासून मतदारांचा बचाव करण्याची जबाबदारी ही प्रशासनावर राहणार आहे. हा खर्च महापालिकेला परवडेल का? असा प्रश्‍न देखील उपस्थित केला जात आहे. 

कार उभी करुन लघूशंकेला थांबला, तितक्यात ओळखीच्यानेच पळविली कार

डेंगीसाठी नऊ हजार घरांचे सर्वेक्षण 
डेंगीचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने अ‍ॅबेटिंगची विशेष मोहीम मागील काही दिवसांपासून सुरू केली आहे. शनिवारी (ता. २२) व सोमवारी (ता.२४) या दोन दिवसांत आरोग्य पथकांनी ९,२५५ घरांचे सर्वेक्षण केले. यात १०९ ठिकाणी पाण्याच्या कंटेनर्समध्ये डासअळ्या आढळल्या. तब्बल ५०० डास उत्पत्तीची स्थाने आढळली. 
पाण्याचे भरलेले १५८ कंटेनर्स रिकामे करण्यात आले तर १२,३९६ कंटेनर्समध्ये अ‍ॅबेट औषधी टाकण्यात आली. दरम्यान, ५०० ठिकाणी डास उत्पत्तीची स्थाने आढळल्याने तेथे कीटकनाशक औषध फवारणी केली. २,६२३ घरांत औषध फवारणी करण्यात आली. विविध ठिकाणी पाण्यात गप्पी मासे सोडून ऑईल टाकण्यात आले. 

loading image