औरंगाबाद : महापालिका अभियंत्याच्या घरातून ४३ तोळे सोने जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Municipal Engineer house raid

औरंगाबाद : महापालिका अभियंत्याच्या घरातून ४३ तोळे सोने जप्त

औरंगाबाद : मनपाच्या नगर रचना विभागातील प्रभारी अभियंता संजय लक्ष्मण चामले यास एका बिल्डरकडून तीन लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. या अटकेनंतर पथकाने त्याचा घराची झाडाझडती सुरु केली. त्याच्या घरातून पथकाने कार, बंगला, पावने चार लाखांची रोकड, ४३ तोळे सोने ताब्यात घेतले. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली असून बेहिशोबी संपत्तीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातारा बायपास येथील एका बिल्डरने दोन एकर जमिनीवर ले-आऊटचा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी नगररचना विभागाचा प्रभारी अभियंता संजय लक्ष्मण चामले याने सहा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. पहिल्या हफ्त्यापोटी तीन लाख रुपये घेताना बायपास येथील त्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केली होती. चामले यास ताब्यात घेताच पथकाने त्याचा घराची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. संजय चामले याच्या घरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सलग दुसऱ्या दिवशीही झाडाझडतीचे काम सुरुच होते.

या पथकाने त्याच्या घरातून पावने चार लाखांची रोख रक्कम, ४३ तोळे सोने, कार बंगलाची कागदपत्रे ताब्यात घेतली. या शिवाय त्याच्या घरातून मोठया प्रमाणावर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. या कागदपत्रांमध्ये त्याची किती संपत्ती आहे? कोणत्या बँकेत किती खाते आहे? एफडी लॉकरची देखील माहिती घेणे सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत आकडा वाढण्याची शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान लाचखोर संजय चामले यास एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :goldaurangabadSakalraid