esakal | औरंगाबादचे 'संभाजीनगर' करा : आता मनसेची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

शिवसेनेला औरंगाबादचे संभाजीनगर करणे शक्यच नाही. हा मुद्दा आता राज ठाकरेच लावून धरतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

औरंगाबादचे 'संभाजीनगर' करा : आता मनसेची मागणी

sakal_logo
By
जगदीश पानसरे

औरंगाबाद : एप्रिल महिन्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. १९८८मध्ये शिवसेनेने औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करा, अशी मागणी केली. या मागणीला हिंदू मतदारांचा चांगला पाठिंबा मिळाला आणि शिवसेना सत्तेत आली. गेल्या ३० वर्षांत हे नामांतर काही झाले नाही. आता तर शिवसेनेनेच कॉंग्रेसशी युती केली. त्यामुळे हा मुद्दा मनसेने हायजॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे. 

औरंगाबादेत इथं धडाधड धडकतात गाड्या

महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात अनेक वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत गाजणारा औरंगाबादच्या 'संभाजीनगर' नामकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरेल, असा विरोधकांचा कयास आहे. त्यामुळेच औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मनसे आमदार राजू पाटील यांनी संभाजीनगर नामकरणासाठी  मनसे प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

हा मुद्दा आता राज ठाकरेच लावून धरतील

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 13 तारखेपासून औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील, अभिजीत पानसे यांच्यासह काही नेते काल शहरात दाखल झाले. पक्षाच्या बैठकीनंतर आमदार राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा काढला.

औरंगाबादेत या उड्डाणपुलाखालून कसे जाल...

राजू पाटील म्हणाले, 2014 मध्ये केंद्रात आणि राज्याच्या सत्तेत शिवसेना सहभागी होती. शहराच्या नामकरणाचा निर्णय केंद्र सरकार करते. शिवसेनेने तसा प्रस्ताव केंद्राकडे देऊन पाठपुरावा करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी केवळ स्वतःच्या राजकारणासाठी याचा वापर केला. आता तर शिवसेनेला औरंगाबादचे संभाजीनगर करणे शक्यच नाही. हा मुद्दा आता राज ठाकरेच लावून धरतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

loading image
go to top