esakal | दात्यांनो, कोरोनाच्या लढ्यासाठी घाटी रुग्णालयाला हवी मदत!
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढतीच आहे. यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनाविरुद्धच्या वैद्यकीय लढ्यात सर्व स्तरातून सहकार्याची व मदतीची घाटी रुग्णालयाला अत्यंत गरज आहे.

दात्यांनो, कोरोनाच्या लढ्यासाठी घाटी रुग्णालयाला हवी मदत!

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद  ः कोरोनाच्या लढ्यात एकीकडे डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जिवाची बाजी लावीत असताना सुरक्षा उपकरणांचा तुटवडा देशात जाणवत आहे. वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा अभाव धोक्याचा ठरू शकतो.

म्हणूनच रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राला आता मदतीची खरी गरज आहे. त्यामुळे दात्यांनी घाटी रुग्णालयाला देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, की सध्या देशात कोविड-१९ कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे. या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात झाला आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढतीच आहे. यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोरोनाविरुद्धच्या वैद्यकीय लढ्यात सर्व स्तरातून सहकार्याची व मदतीची घाटी रुग्णालयाला अत्यंत गरज आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

संस्थेच्या सीएसआर खात्यावर देणगी द्यावी. निधीशिवाय वैद्यकीय यंत्रसामग्री, एन-९५ मास्क, थ्री लेयर मास्क, पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट (पीपीई किट), कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होऊ शकणाऱ्या बाबी देणगी द्यायची असल्यास अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेतील औषधवैद्यकशास्त्र विभागामध्ये देणगी कक्ष १३ एप्रिलपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या देणगी कक्षाचे समन्वयक म्हणून डॉ. अरविंद गायकवाड (ओएसडी कर्करोग रुग्णालय) औरंगाबाद यांची नियुक्ती प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे. 

येथे द्या देणगी व मदत 
प्रत्यक्ष मदत ‌घाटीत ग्राऊंड फ्लोअर, कॉलेज बिल्डिंग, पोस्ट ऑफिस बाजूला सकाळी दहा ते सायंकाळी चारदरम्यान कार्यालयीन वेळेत आपण करू शकता. तसेच देणगीसाठी आयडीबीआय बँकेच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल देणगी समिती औरंगाबाद या खात्यात ०६३३१०२०००००५६७८ संस्थेच्या सीएसआर खाते क्रमांकावर मदत करता येईल, यासाठी आयएफएससी कोड IBKL००००६३३ हा आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

loading image