esakal | औरंगाबाद पोलिसांची धडक कारवाई! चिनी मांजा प्रकरणात आठ जणांवर गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad police.

चिनी नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आठ गुन्हे दाखल केले आहेत

औरंगाबाद पोलिसांची धडक कारवाई! चिनी मांजा प्रकरणात आठ जणांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: चिनी नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आठ गुन्हे दाखल केले आहेत. याचा अहवाल पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी सादर केला. यासंदर्भात सुमोटो याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्याकडे मंगळवारी होईल.

चिनी नायलॉन मांजा पुरविणारे, खरेदी-विक्री करणारे आणि या मांजाद्वारे पतंग उडविणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार किती जणांवर कारवाई केली यासंबंधीचा अहवाल दाखल करण्याचे आदेश यापूर्वीच्या सुनावणीत देण्यात आले होते. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला होत तर नागपूर येथे एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता.

'हर्षवर्धन जाधव यांच्यावरील गुन्हे मागे घ्या नाहीतर आंदोलन'

दरम्यान, या मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे, मृत होण्याचे प्रमाण बरेच आहे. माध्यमांमधील वृत्ताची दखल घेत खंडपीठाने तीस डिसेंबरला सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. औरंगाबाद पोलिस आयुक्तालय आणि जिल्ह्यात अशा प्रकारे मांजा वापरणाऱ्यांवर काय कारवाई केली, किती साठवणूकदारांवर छापे टाकले, किती गुन्हे दाखल केले, संबंधित मांजा वापराच्या बंदीसंबंधी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जात आहे काय, अशी विचारणाही खंडपीठातर्फे करण्यात आली होती. 

Corona Impact: अजिंठा लेणीत पर्यटकांचा संमिश्र प्रतिसाद; व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

शहरात आठ जणांवर कारवाई केल्याचे पोलिसांच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी कंडपीठात सांगितले. न्यायालयाचे मित्र म्हणून अॅड. सत्यजीत बोरा यांनी काम पाहिले.

(edited by- pramod sarawale)

loading image