औरंगाबाद : पोलिस भरती संस्थाचालकाकडून विद्यार्थिनीस मारहाण, विनयभंग

स्पेशल फोर्स ॲकॅडमीच्या नवनाथ राठोडविरोधात गुन्हा दाखल
crime news
crime newsSakal

औरंगाबाद : पोलिस भरती संस्थेच्या संचालकाने ग्राऊंडवर प्रॅक्टीसला न गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीस ग्राऊंडवर का आली नाही असे म्हणत गंभीर मारहाण केली. इतकेच नव्हे तर विद्यार्थिनी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन तिथे तिचा विनयभंग केला. विनयभंग करताना विद्यार्थिनीने संशयित आरोपीस दूर ढकलल्याचा राग अनावर झाल्याने त्याने तिथेही मारहाण केली. हा संतापजनक प्रकार ७ जुलैच्या रात्री साडेअकरादरम्यान हडको-११ आणि एन १२ परिसरात घडला. याप्रकरणी संस्थाचालकावर सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून नवनाथ राठोड असे आरोपी संस्थाचालकाचे नाव आहे.

सिल्लोड तालुक्यातील १७ वर्षीय विद्यार्थिनीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार ती एन-१२ परिसरात मैत्रिणीसह राहत असून २४ जुनपासून संशयित नवनात राठोड हा संचालक असलेल्या जिजाऊ चौक, जिजाऊ मेडिकल परिसरातील स्पेशल फोर्स ॲकॅडमीमध्ये पोलिस भरतीची तयारी करते. तसेच राठोड याच्याच मालकीच्या मेसमध्ये पीडितेची मेस आहे. सकाळी ती मैदानावर व्यायामासाठी जाते.

परंतू ६ आणि ७ जुलैरोजी पिडीता आजारी असल्याने ती ग्राऊंडवर प्रॅक्टीससाठी गेली नाही. ७ जुलैच्या सकाळी ती जिजाऊ चौकातील जिजाऊ मेडिकलच्या वरच्या मजल्यावरील मेसमध्ये मैत्रिणीसोबत जेवण्यासाठी गेली असता, तिथे संशयित नवनाथ राठोड याने ‘आज ग्राऊंडवर का आली नाही’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर तिचा हात धरुन दोन्ही कानाखाली झापडा मारल्या. दरम्यान पिडीतेची तब्येत बिघडल्याने ती न जेवताच खोलीवर निघून गेली.

खोलीवर जाऊनही केली मारहाण

पिडीता ही रात्री मैत्रिणीसोबत साडेअकरा वाजेदरम्यान खोलीत असताना नवनाथ राठोड हा अचानक मुलींच्या खोलीत घुसला आणि पिडीतेचा हाताला धरुन त्याच्याकडे ओढू लागला. त्यावेळेस पिडीतेने त्याला ढकलून दिले. ढकलून दिल्याचा राग मनात धरुन चिडलेल्या राठोडने घरातील मोठ्या झाडूने पिडीतेला सपासप मारण्यास सुरवात केली, हा प्रकार बघून तिच्या मैत्रिणी घाबरुन गेल्या, त्याचवेळेस पिडीतेच्या घरमालक दाम्पत्याने पिडीतेला राठोडच्या तावडीतून सोडवत बाजूला केले. याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरुन सिडको पोलिसांत विनयभंग, पोक्सोसह कायद्यासह इतर कलमानुसार राठोडविरोधात गुन्हा दाखल झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com