esakal | शिवसेना नेते खैरेंच्या अंगावर मनसेने फेकली पत्रके, संभाजीनगर नामकरणावर आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant khaire News

मनसेने २६ जानेवारीचा अल्टिमेटम दिला होता. नाहीतर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारही दिला होता.

शिवसेना नेते खैरेंच्या अंगावर मनसेने फेकली पत्रके, संभाजीनगर नामकरणावर आक्रमक

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : औरंगाबाद येथील क्रांती चौकात माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे वाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (ता.चार) अडवून संभाजीनगरचे पत्रक त्यांच्यावर फेकण्यात आले आहे. या प्रसंगी शिवसेनेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे,  शहराध्यक्ष सतनाम गुलाटी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मनसेने २६ जानेवारीचा अल्टिमेटम दिला होता. नाहीतर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारही दिला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात राज्यात ठिकठिकाणी पक्षातर्फे आंदोलने करण्यात आले.

पत्रकात म्हटले आहे, की औरंगाबाद नामांतर झालेच पाहिजे व शहराचा नाहीतर संपूर्ण जिल्ह्याचा विकास देखील झाला पाहिजे. धिक्कार असो, धिक्कार असो... औरंगाबादचे नामांत झालेच पाहिजे.... धिक्कार असो... धिक्कार असो.. उत्तर द्या.. उत्तर द्या , नाहीतर खूर्च्या खाली करा जनाची नाही तर मनाची तरी ठेवा , संभाजीनगरकर  आता आपणाला जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मनसेतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.  

संपादन - गणेश पिटेकर

loading image