औरंगाबाद : खून प्रकरणातील 'आठवा' आरोपी अटकेत

सुरक्षा रक्षक खून प्रकरणातील आरोपीला सिडको पोलिसांनी केली अटक
crime case
crime casesakal

औरंगाबाद : सुरक्षा रक्षकाचे हात-पाय बांधून लाकडी दांड्यानी क्रूर आणि अमानुष पद्धतीने बेदम मारहाण खून प्रकरणातील आठव्या आरोपीला सिडको पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. संविधान पुंजाराम जाधव (वय २७, रा. शताब्दीनगर, एन-१२ हडको) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला २६ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. यू. न्‍याहारकर यांनी रविवारी (ता. २४) दिले. यापूर्वी अटक झालेल्या सात जणांनाही न्‍यायालयाने २६ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मनोज शेषराव आव्हाड (वय २७, रा. विवेकानंद नगर) याला मेघावाले सभागृहातील फोकस लाईट चोरल्याच्‍या संशयावरून माजी नगरसेवकाच्‍या दोन मुलांसह सात ते आठ जणांनी हात आणि पाय बांधून लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून त्‍याचा खून केला होता.

विशेष म्हणजे या अमानुष मारहाणीचा व्‍हीडीओ तयार करून आरोपींनी त्‍याच्‍या भावाला पाठविला. त्‍यानंतर मनोजचा मृतदेह अष्टपाल गवई याने एका लोडींग रिक्षामधून घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात टाकला व तेथून पोबारा केला. प्रकरणात मयत मनोजची आई अरुणा आव्‍हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे. हा गुन्‍हा घडल्यापासून आरोपी संविधान जाधव हा पसार होता.

पोलिसांनी तपास करून आरोपी संविधानला बेड्या ठोकल्या. त्‍याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले होते. न्यायालयात सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी युक्तिवाद केला. मयताचा मारहाणीत खून झाल्यानंतरचे त्‍याचे कपडे हस्‍तगत करायचे आहे. गुन्‍हा करतेवळी आरोपीने परिधान केलेले कपडे जप्‍त करायचे आहे. गुन्‍ह्याचे चित्रण करण्‍यासाठी वापरण्‍यात आलेला मोबाईल जप्‍त करायचा आहे. गुन्‍ह्यातील इतर आरोपींना अटक करायची असल्‍याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com