Aurangabad : मराठवाड्यात कर्मचारी संपामुळे बससेवा बंदच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

मराठवाड्यात कर्मचारी संपामुळे बससेवा बंदच

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बसची चाके जागच्या जागीच आहेत. दिवाळीपूर्वी काही दिवस व दिवाळीपासून आतापर्यंत ही सेवा ठप्पच असून प्रवाशांची कसरत सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर अद्याप तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. या महिनाअखेरीस संपाला महिन्याचा कालावधी पूर्ण होईल. आतापर्यंत मराठवाड्यात महामंडळाला सुमारे सत्तर कोटींचा फटका बसला आहे.

मराठवाड्यात बसवाहतूक बंद झाल्याचा कालावधी आगारनिहाय वेगवेगळा आहे. तरीही बहुतांश आगारांतून बससेवा सुमारे पंधरा ते वीसपेक्षा अधिक दिवसांपासून बंदच आहे. बहुतांश कर्मचारी संपात सहभागी असून काही निलंबित झाले आहेत. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे ही कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. या काळात मराठवाड्यातील आगारांतून होणाऱ्या हजारो फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ७० कोटींचा महसूल बुडाला आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

दृष्टिक्षेपात परिवहन महामंडळाची मराठवाड्यातील स्थिती

जिल्हा एकूण एकूण संपात सहभागी निलंबित बडतर्फ संपापूर्वी होत संपापूर्वीचे आतापर्यंतचे

आगार कर्मचारी कर्मचारी कर्मचारी कर्मचारी असलेल्या फेऱ्या रोजचे उत्पन्न झालेले नुकसान

औरंगाबाद ८ २७८१ २५७५ ७२ -- १२२८ ५२ लाख ८ कोटी ५० लाख

नांदेड ९ ३२०३ २५०० ६५ -- २२०० ५० लाख १२ कोटी ५० लाख

जालना ४ १२४८ ११७८ २९ २१ ३५० ते ३७५ २४ लाख ३ कोटी ९६ लाख

बीड ८ २६०४ २६०४ ९५ -- १०२५ ५५ लाख १२ कोटी ५० लाख

परभणी ४ १५८६ १५०७ ५० ०६ ६०५ २५ लाख ५ कोटी

लातूर ५ २४५९ २२०८ ६३ ०२ १५२१ ४८ लाख १४ कोटी ११ लाख

उस्मानाबाद ६ २४९८ २४०१ ५५ -- २९५८ ४९ लाख ९ कोटी ७८ लाख

हिंगोली ३ ७५० ७४५ १६ १२ ५४५ ५० लाख ३ कोटी ४५ लाख

loading image
go to top