आता शिक्षकांवर राहणार 'सीसीटीव्ही वॉच' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

teacher CCTV watch

आता शिक्षकांवर राहणार 'सीसीटीव्ही वॉच'

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत विद्यार्थ्याच्या तासिका घेणे सोडून जे शिक्षक शिक्षण विभागात आढळून येतील, त्यांच्या नोंदी ठेवा. सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवा. त्याचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयास सादर करावा, असे निर्देश शिक्षण आयुक्त सुरज पांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शिक्षकांना शाळेच्या मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत. तसेच शाळेच्या वेळेत त्यांनी विना परवानगी शिक्षण विभागात येवू नये. असे असतांना देखील परवानगी न घेता तसेच कधी कधी रजा न घेता देखील शाळेच्या वेळेत मुख्यालय सोडून अनेक शिक्षक, संघटनांशी संबंधत शिक्षक हे शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण विभागातील इतर संबंधित विभागात ये-जा करतांना आढळून येतात.

तेंव्हा कामामध्ये पारदर्शकता असावी. शाळेच्या वेळेत विद्यार्थी विकासाचे काम होणे अपेक्षित आहे. शाळेची गुणवत्ता वाढवावी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रमही राबविण्यात यावेत. शिक्षकांसह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी देखील स्मार्ट वर्क करावे. वेळेत सर्व कामे व्हायला हवी.

शिक्षण विभागातील सर्व कामे ही पारदर्शक असावेत. म्हणून यापुढे शिक्षण विभागातील विविध दालनांमध्ये येणारे शिक्षक, संघटनांशी संबंधित शिक्षक यांच्या येण्या-जाण्याची आवक-जावक विभागात नोंद ठेवा. सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यातील तीन महिन्यांचे फुटेजही जपून ठेवा, असे आदेश शिक्षण आयुक्त मांडरे यांनी दिले आहेत.

Web Title: Aurangabad Teacher Cctv Watch Education Commissioner Suraj Pandhare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top