औरंगाबाद : वकिलाला मारहाण करून हिसकावले तीन हजार

निराला बाजार भागात जिल्हा परिषदेसमोरील घटना
Aurangabad Three thousand theft by beating lawyer
Aurangabad Three thousand theft by beating lawyerSakal

औरंगाबाद : न्यायालयाकडे निघालेल्या वकिलाच्या वाहनाला हूल देत युटर्न घेणाऱ्या कारमधील तिघांनी मारहाण करून खिशातील पैसे हिसकावल्याची घटना निराला बाजार रस्त्यावर घडली. विशाल राजू गाडेकर (३०, रा. जुना बाजार) हे जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते वाहनाने न्यायालयाच्या कामानिमित्त निघाले होते.

निराला बाजार भागात जिल्हा परिषदेसमोरील शौचालयासमोर कार चालकाने (एमएच-१५-सीडी-०४७८) अचानक युटर्न घेतला. त्यामुळे गाडेकर यांचा अपघात होता होता बचावले. त्यानंतर कारमधील तिघांनी उलट गाडेकर यांनाच तुला दिसत नाही का ? असे म्हणत मारहाण करून खिशातील ३ हजार रुपये हिसकावले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com