esakal | कन्नड तालुक्यात मृत्यूने गाठली शंभरी, एकाच दिवसात दोन हजारांवर नागरिकांनी घेतली कोरोना लस

बोलून बातमी शोधा

Kannad Corona Updates

गुरुवारपर्यंत (ता.आठ) तालुक्यात एकूण २० हजार १५९ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

कन्नड तालुक्यात मृत्यूने गाठली शंभरी, एकाच दिवसात दोन हजारांवर नागरिकांनी घेतली कोरोना लस
sakal_logo
By
संजय जाधव

कन्नड (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्यात एकाच दिवसात तब्बल दोनह हजार २०८ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. गुरुवारपर्यंत (ता.आठ) तालुक्यात एकूण २० हजार १५९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. दुसरीकडे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. तालुक्यात गुरुवारी ७१ बधितांची नव्याने भर पडली, तर उपचार घेणाऱ्यांची संख्या ५९३ वर पोहोचली आहे. कन्नड तालुक्यात आतापर्यंत दोन हजार ८९९ जणांना कोरोना आजार झाला आहे.

कोरोना नियम मोडल्याने वधूवरासह ३०० जणांवर कारवाई, थाटात लग्न करणे पडले महागात

आंबातांडा या एकाच गावात बुधवारी ११, तर गुरुवारी ८ रुग्ण आढळून आले. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कन्नड शहरातील २९ आणि ग्रामीण भागातील ४२ असे एकूण ७१ बाधित आढळले आहेत. ग्रामीण रुग्णालयात ४०, शिवाजी महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृहात ५६, औरंगाबाद येथे ४०, घरगुती विलगीकरण ३८७, चिखलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५, खुलताबाद येथे एक, तर ६४ रुग्ण इतर ठिकाणी उपचार घेत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर