esakal | पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच!
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Suicide News

सतत पडणारा दुष्काळ व या वर्षी अतिवृष्टी यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.

पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच!

sakal_logo
By
संतोष शिंदे

पिशोर (जि.औरंगाबाद) : सतत दुष्काळ व या वर्षी अतिवृष्टी या कारणाने शेतमालाचे झालेले प्रचंड नुकसान सहन न झाल्याने व कर्जाच्या विवंचनेतून येथील शफेपुर भागातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.28) सकाळी उघडकीस आली. शांताराम मनोज वाघ (वय 35) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

वाचा -  भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून


या बाबत अधिक माहिती अशी की, शफेपुर भागातील रहिवाशी शांताराम वाघ याची खडकी शिवारात गट क्रमांक 66 मध्ये सामायिक जमीन आहे. याच ठिकाणी वडील मनोज वाघ यांची गट क्रमांक 71 मध्ये जमीन आहे. सतत पडणारा दुष्काळ व या वर्षी अतिवृष्टी यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सोसायटीचे 28 हजार रुपये आणि बँकेचे कुटुंबाने घेतलेले 60 हजार रुपये कर्ज कसे फेडायचे?

वाचा - संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे कोणाचाही दबाव मानत नाहीत

या विवंचनेतून या तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. शांताराम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ व बहीण असा परिवार आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांच्यावर येथील शफेपुर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


पुन्हा एकदा हेळसांड
दोन वेळा आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित केलेल्या पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष बंद असल्याने परिसरातील मृतदेहांची अहेवलनेसोबत नातेवाईकांना सुद्धा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. शवविच्छेदनासाठी येथून जवळपास अंदाजे दहा किलोमीटरचा अंतराचा फेरा मारावा लागत आहे. यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा नाहक वेळ खर्च होतो सोबत त्यांना आर्थिक फटका बसत आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि येथील विद्यमान राजकीय नेतृत्व हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image