फुलंब्री : पर्यटनाच्या नावाखाली ओल्या पार्ट्यांची मेजवानी

सारोळा येथील प्रकार : विकसित होणारे पर्यटनस्थळ होतेय विद्रूप, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
पर्यटनाच्या नावाखाली ओल्या पार्ट्यांची मेजवानी
पर्यटनाच्या नावाखाली ओल्या पार्ट्यांची मेजवानीsakal

फुलंब्री : फुलंब्री ते औरंगाबाद रस्त्यावरील चौका गावाजवळ असलेला सारोळा परिसर वनविभागाकडून पर्यटन केंद्र विकसित होत आहे. डोंगर, दर्या तसेच हिरवाईने नटलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुटुंबीय पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, येथे काही महाभाग पर्यटनाच्या नावाखाली येथे ओल्या पार्ट्यां झोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पर्यटप्रेमींना रोष व्यक्त केला असून वरिष्ठांनी दखल घेऊन योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.

औरंगाबादपासून चौका गाव १२ किलोमीटर असून या रस्त्यावरूनच सारोळा येथे जाण्यासाठी सुमारे सहा किलोमीटरचा रस्ता असून येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूने दाट झाडी मन उल्हसित करते. व्ह्यू पॉइंटवरून दूरवर पसरलेले डोंगर, दऱ्या, तलाव, झाडी, फुले हे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. ऊन, वाऱ्यापासून संरक्षणासाठी जागोजागी पत्र्याचे निवारे उभारले आहे. मात्र, या पत्राच्या निवाऱ्याचीही सध्या दुरवस्था झाली असून पत्रे उडू लागली आहे. या पत्राच्या निवाऱ्यात जाण्यासाठी असणाऱ्या पायऱ्याही खचले आहेत. त्यामुळे वनविभागाचे पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

पर्यटनाच्या नावाखाली ओल्या पार्ट्यांची मेजवानी
थँक्स कॅप्टन कोहली आणि कोच शास्त्री, टीम इंडियाने दिला विजयी निरोप

हिरवाईने नटलेल्या हा परिसर थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे. या ठिकाणी आंबा, सीताफळ, रामफळ, कवट, बोर, आधी विविध रंगी बेरंगी फुलांची झाडे आहेत. या घनदाट जंगलात मोर, हरिण, माकडे, कोल्हे, लांडगे अशा विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. दर शनिवारी-रविवारी पर्यटकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनाही संधी चालून येऊ लागल्या आहे.

मात्र, या पर्यटनस्थळी ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या असल्यामुळे ओल्या पार्ट्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे येथील नागरिक सांगतात. ओल्या पार्ट्या करणाऱ्या महाभागांमुळे येथील पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत पर्यटप्रेमींनी रोष व्यक्त केला असून वरिष्ठांनी दखल घेऊन योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.

वनविभागासह पोलिसांचे दुर्लक्ष

पर्यटनाच्या नावाखाली वनपरिक्षेत्र मध्ये दारुड्यांच्या ओल्या पार्ट्यांची धूम सुरू झाली आहे. याकडे संबंधित वनविभागाचे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष देण्यास तयार नाही. पोलिसही या परिसरात फिरकायला तयार नसल्याने हे सारोळा पर्यटक स्थळ आता दारूच्या पार्ट्या म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी पर्यटन स्थळाची वाईट परिस्थिती झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना अशा नागरिकांची भीती निर्माण झाली आहे. मात्र वन विभागाने या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ एक किंवा दोन कर्मचारी तैनात करावे. त्याचबरोबर पोलिस यांनी तर रोज याठिकाणी पर्यटकांची माहिती घ्यावी, अशी मागणी सुहास अजगावकर (पर्यावरणप्रेमी) यांनी केली आहे.

पर्यटनाच्या नावाखाली ओल्या पार्ट्यांची मेजवानी
भारत-म्यानमार सीमेवर लष्कराला सापडली 250 किलो स्फोटकं

काय आहे पाहण्यासारखे..?

म्हैसमाळ सारखे दोन व्ह्यू पॉइंट आहेत. तीन शिवकालीन बारव, तलाव, कोरीव गुफा. कानिफनाथ मंदिर, श्री गणेश मंदिर

पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण

वनविभागाने सारोळा परिसरात चांगले रस्ते बांधण्यावर भर द्यावा, पायाभूत सुविधा मिळाल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भविष्यात वाढ होऊ शकते. सारोळा हे वनपरिक्षेत्र औरंगाबाद शहरांच्या अगदी जवळ पर्यटनस्थळ असल्याने शहरातील दररोज शेकडो पर्यटक पाहण्यासाठी जातात, परंतु या ठिकाणी सुविधा व सुरक्षा या नसल्यामुळे व दारुड्यांच्या भीतीपोटी पर्यटकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com