esakal | नोकरी सोडून रमले ‘कास्टिंग ज्वेलरी’त, तरुणांच्या प्रयत्नांना यश
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश बागूल, सुबोधकांत कसबेकर

नोकरी सोडून रमले ‘कास्टिंग ज्वेलरी’त, तरुणांच्या प्रयत्नांना यश

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : औरंगाबादेतीलAurangabad गणेश बागूल, सुबोधकांत कसबेकर या तरुणांनी नोकरी सोडण्याचे धाडस करून स्वतःचे स्टार्टअप StartUp सुरू करण्याचे ठरविले. त्यासाठी येथे कमी स्पर्धा असलेल्या ‘कास्टिंग ज्वेलर्स’चा Casting Jewellers व्यवसाय निवडला. गुजरातमधून यंत्रसामग्री मागवून ‘आर्गुणाज कास्टिंग्स’हे स्टार्टअप सुरू केले. कमी भांडवलात योग्य नियोजन करत त्यांनी घराच्या गच्चीवर पत्र्यांचे शेड उभारले. तेथे सोन्या-चांदीच्या ‘कास्टिंग ज्वेलरी’तयार केली जात आहे. गणेश विजय बागूल आणि सुबोधकांत कैलास कसबेकर हे एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. टेक. (मॅकेनिक) झाले आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर २०१८ मध्ये दोघांनी येथील एका खासगी कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. नोकरीपेक्षा काही तर वेगळे करावे असे त्यांना वाटत होते. पण घरच्यांना सांगण्याचे धाडस होत नव्हते. एमबीए करायचे असल्याचे घरच्यांना सांगून अखेर दोघांनी नोकरी सोडली. पण निर्धार केला तो व्यवसाय सुरू करण्याचा.aurangabad two youths start their startup

हेही वाचा: वैजापूर तालुक्यात अपघात, दोघा तरुणांचा मृत्यू

अनुभवाचा उपयोग स्टार्टअपसाठी

दोघांचे नातेवाईक सोने-चांदीच्या व्यवसायात आहेत. खासगी कंपनीत दोन वर्षे ॲल्युमिनिअम कास्टिंगच्या मिळालेल्या अनुभवाचा वापर करून ‘ज्वेलरी कास्टिंग’मध्ये येण्याचा निर्णय गणेश, सुबोधकांत यांनी घेतला. येथे सहजासहजी ‘ज्वेलरी कास्टिंग’ होत नाही. यंत्रसामग्रीही उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सर्धाधिक ज्वेलरी कास्टिंग होत असलेल्या राजकोट Rajkot, सुरत Surat येथील माहिती घेतली. तेथे जाऊन या व्यवसायाचा अभ्यास केला. या व्यवसायाला औरंगाबादेत चांगली संधी असल्याची खात्री झल्यानंतर त्यांनी गुजरातेत Gujrat महिनाभर प्रशिक्षण घेतले.

हेही वाचा: Hingoli Rain Updates : हिंगोल जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस

कर्ज काढून यंत्रसामग्री

निर्णय पक्का झाल्यावर दोघांनी आर्थिक जुळवाजुळव सुरू केली. मोठ्‍या प्रयत्नांनंतर एका बँकेडून कर्ज मिळाले. कर्ज, अल्प नोकरीतील अल्पपुंजी गोळा करून यंत्रसामग्री विकत घेतल्यावर जागेचा प्रश्न आला. जागा विकत किंवा भाड्याने परवडणार नसल्याने न्यू विशालनगरातील स्वतःच्या घराच्या गच्चीवरच पत्र्यांचे शेड उभारले. तेथे अलीकडेच स्वप्नातला स्टार्टअप सुरू केला.

सोन्या-चांदीच्या वस्तू

चांदीच्या अंगठ्या, पेडंट्स, चांदीच्या मूर्ती, बांगड्या, सोन्याची मोरणी, सोन्याच्या अंगठ्या, कानातील दागिने आदी विविध प्रकारचे दागिने तयार करायला त्यांनी सुरवात केली. मार्केटिंगचा आधीच विचार केल्यानुसार त्यांना प्रतिसादही मिळू लागला. आधी किरकोळ विक्री केली आणि आता तर घाऊक विक्रेते घरी येऊन माल घेऊन जात आहेत. कोरोनाकाळात धपडत करत दोन तरुणांना सुरू केलेल्या स्टार्टअपला भागवत निकम, अनिल विसपुते यांनी सर्वतोपरी मार्गदर्शन केले.

loading image