Aurangabad: आता लसीकरणाची वाढविली वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

औरंगाबाद : आता लसीकरणाची वाढविली वेळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याशिवाय पेट्रोल नाही, पगारही मिळणार नाही तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश नाही, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.

बुधवारी (ता. २४) शहराच्या अनेक भागात लांबच लांब रांगा लागल्या. नागरिकांचा हा प्रतिसाद पाहून लसीकरणाची वेळ दोन तास वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारपासून (ता. २५) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत लसीकरण होईल, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. गर्दीमुळे अतिरिक्त पथके पाठविण्यात आले. जिन्सी, शहाबाजार, सिडको एन-८, बन्सीलालनगर केंद्रांवर नागरिकांनी लस घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी महापालिकेतील माजी सैनिक अनेक केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने चार रिक्षा लावून घरोघरी जाऊन लस देण्याची मोहीम बुधवारपासून सुरू केली. केवळ आधार कार्ड दाखविल्यानंतर नागरिकांना लस मिळणार आहे.

loading image
go to top