Aurangabad : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Waluj MIDC Police

Aurangabad : आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण

वाळूजमहानगर : पतीसोबत कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी जात असलेल्या एका २८ वर्षीय महिलेचे प्राण वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरुमे यांच्या तत्परतेमुळे वाचले. ही घटना बुधवारी (ता.२४) सायंकाळी साजापूर येथे घडली.

पोलीस कॉलनी, साजापूर येथील कुसूम कृष्णा गिरी (२८) यांना तीन मुली व एक मुलगा असून तिचा पती डाव्या पायाने अपंग आहे. कुसुम मोलमजुरी करतात. मात्र, काही कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमी खटके उडत होते. बुधवारी (ता.२४) पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी कृष्णा गिरी याने तिला शिवीगाळ करत तुझे वागणे चांगले नाही, माझ्या घरात राहू नको असे बजावले. त्यामुळे कुसुम ही रागाच्या भरात धरणाच्या दिशेने आत्महत्या करण्यासाठी धावत होती. दरम्यान तिने ही हकीकत तिसगाव येथील भाऊ संतोष यास फोन करून सांगितली.

भाऊ भावजय धावले मदतीला

कुसुम ही आत्महत्या करण्यासाठी धरणावर गेल्याचे समजताच घाबरलेला तिचा भाऊ, भावजय व आई यांनी तिसगाव परिसरातील धरणाकडे धाव घेत तिचा शोध घेत होते. दरम्यान, गणपती विसर्जन ठिकाण पाहण्यासाठी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी साजापूरचे पोलीस पाटील रशीदखान पठाण यांना साजापूर तलावावर या, असा निरोप देत गुरमे हे तलाव पाहणी करण्यासाठी पोकॉ योगेश शेळके, स्वप्नील अवचरमल, राहुल रणवीर यांच्यासह आले होते. त्याचवेळी त्यांना ही माहिती मिळाली.

गांभीर्य लक्षात घेत श्री. गुरमे यांनी तात्काळ साजापूर येथील पोलीस पाटील रशीदखा पठाण यांना फोन करून धरणावर कोणी महिला आत्महत्येचा प्रयत्न करते का, ते पाहण्यास सांगितले. त्याचवेळी कुसुम धावत आत्महत्या करण्यासाठी धरणाकडे येत होत्या. ते पाहून पोलीस पाटील रशीदखा पठाण यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या शेख इस्माईल, शेख अफरोज यांनी या महिलेला रोखले. तोपर्यंत पोलीस निरीक्षक संदीप हे घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या महिलेची त्यांनी समजूत काढत तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

Web Title: Aurangabad Waluj Midc Police Suicide Case Wife Husband Dispute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..