Aurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणार

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत-२ मधून निधी
Aurangabad waste management
Aurangabad waste management

औरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्याचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

कचऱ्यावर प्रक्रियेसंदर्भात केंद्राने स्वच्छ भारत मिशन २.० सुरू केले आहे. याअंतर्गत शहरातल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भातील केंद्राने महापालिकेकडून सी- स्वॅप (सिटी सॉलिड वेस्ट अ‍ॅक्शन प्लान) मागविले आहेत. त्यानुसार महापालिकेने राज्य शासनाकडे सी-स्वॅप कृती आराखडा पाठवला होता. याअंतर्गत शहरातील नारेगाव कचरा डेपो तसेच पडेगाव व चिकलठाणा येथे निर्माण झालेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करून ते नष्ट करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे.

राज्य शासन स्तरावर या कृती आराखड्याच्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. त्यातून काही त्रुटींची पूर्तता करण्यासह प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्याचे निर्देश राज्य शासनाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमकडे पुनर्मूल्यांकनाचे काम देण्यात आले आहे.

पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली की नव्याने प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. नंतर अमृत-२ साठी तो थेट केंद्राकडे जाईल. हा कृती आराखडा मंजूर झाल्यानंतर कचऱ्यावरील बायोमायनिंगच्या प्रक्रियेसाठी निधी मिळेल. या निधीतून लगेच बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी दिली.

बांधकामाच्या टाकाऊ साहित्यावरही प्रक्रिया

सिटी सॉलिड वेस्ट अ‍ॅक्शन प्लानअंतर्गत महापालिकेने सीएनडी वेस्ट (इमारत, बांधकामाचे टाकाऊ साहित्य) याचाही एक प्रकल्प शहरात उभारण्याचे नियोजन केले आहे. निधी मंजूर होताच हा प्रकल्पदेखील हाती घेतला जाणार आहे, असे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com