औरंगाबाद : शिवसेनेमुळे शहराचा पाणीप्रश्न बिकट

डॉ. भागवत कराड : फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज जलआक्रोश मोर्चा
Aurangabad water scarcity Shiv Sena against movement under leadership of Fadnavis
Aurangabad water scarcity Shiv Sena against movement under leadership of Fadnavissakal

औरंगाबाद : शहरात शिवसेनेमुळेच पाणीप्रश्‍न बिकट बनला आहे. महापालिकेत शिवसेनेचाच सभागृहनेता होता. एखादा विषय मांडायचा असेल तर तो आधी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे द्यावा लागत होता. ते त्या विषयाची चाळणी करून कुठला विषय मंजूर करायचे हे ठरवत होते. एकूणच महापालिकेचा रिमोट खैरे यांच्या हाती होता, म्हणूनच पाणीपुरवठ्यासह इतर योजनांची माती झाल्याचा आरोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

शहरातील पाणीप्रश्‍नाबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी भाजपतर्फे सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पैठण गेट ते महापालिका दरम्यान जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह ३० हजार नागरिक सहभागी होणार आहेत, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

पुढे डॉ. कराड म्हणाले की, आमच्या नगरसेवकांनी पाण्यासाठी आंदोलने केले. भाजपच्या उपमहापौर असलेल्या औताडे यांनी पाणीप्रश्‍नासंदर्भात राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकारने १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारने दोन्ही बजेटमध्ये एक रुपयाही दिला नाही. पत्रकार परिषदेस भगवान घडामोडे, अनिल मकरिये, प्रशांत देसरडा, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, कचरू घोडके उपस्थिती होते.

दरम्यान, १६८० कोटींची योजना मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने केवळ उद्‍घाटन केले. वेळेत योजनेचे काम न झाल्यामुळे ४०० कोटींचा खर्च वाढल्याचा आरोप आमदार सावेंनी केला. आतापर्यंत योजनेचे काम केवळ १२ टक्केच झाले. त्यामुळे याचेही समांतर होती की काय अशी भीती वाटू लागल्याची टीका त्यांनी केली.

परवानगी दिली; पण मार्ग बदलला : केणेकर

मोर्चाची पोलिसांकडे परवानगी मागितली. आमचा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ द्यायचा नाही, म्हणून आम्ही दिलेल्या मार्गाऐवजी दुसरा मार्गाची परवानगी दिली. महाविकास आघाडी सरकार मोर्चाला घाबरले आहे, अशी टीकाही भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com