औरंगाबाद : विहिरीचे पाणी चालणार नाही

नागरिकांची भूमिका : कंत्राटदाराने केले टॅंकर बंद
Aurangabad water scarcity
Aurangabad water scarcitySakal

औरंगाबाद : महापालिकेकडून नळाद्वारे जो पाणीपुरवठा केला जातो ते पाणी मिळावे यासाठी आम्ही महापालिकेकडे पैसे भरतो. मात्र आम्हाला विहिरीचे पाणी दिले जाते, ते खपवून घेणार नाही असे म्हणत पडेगाव, मिटमिटा आदी भागातील नागरिकांनी विहिरीच्या पाण्याला विरोध केला. यामुळे वैतागलेल्या कंत्राटदाराने दोन दिवसांपासून टँकर बंद केले आहेत.

ज्या भागातील नागरीकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो त्यांना नक्षत्रवाडी, कोटला कॉलनी, सिडको एन - ५ आणि सिडको एन - ७ येथील जलकुंभांवरुन टॅंकर भरून पाणी पुरवठा केला जातो. मात्र शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलकुंभांवरील टँकर बंद करण्यात आले. सिडको एन - ७ आणि एन - ७ जलकुंभांवरील टँकर एमआयडीसीच्या सिडको एन -१ येथील केंद्रावर स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नक्षत्रवाडी आणि कोटलाकॉलनी जलकुंभावरील टँकर बंद केले, हे टँकर जहागीरदार कॉलनी येथील विहिरीवरीकडे पाठवले. गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना या विहीरीतून पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांना आता या पाण्याचा विरोध सुरु केला आहे.

आम्ही महापालिकेच्या पाण्यासाठी पैसे भरतो आणि तुम्ही विहिरीचे पाणी पाजता असे म्हणत विहिरीचे पाणी पिण्यास नागरिकांनी नकार दिला. मागील दोन्ही दिवशी पडेगाव येथे नागरिकांनी विहिरीच्या पाण्याने भरलेल्या टँकरला विरोध केला. काही नागरिकांनी टँकर चालकावर हल्ला केला, विहिरीचे पाणी आणले तर टँकरवरही हल्ला करण्याचा इशारा दिला. या प्रकारामुळे कंत्राटदाराने दोन दिवसांपासून टँकर बंद केले आहेत. नागरिकांच्या विरोधाची दखल घेत महापालिकेने सोमवारी (२० जून) दूपारच्यानंतर नक्षत्रवाडी येथून टँकर सुरु केले. तर कोटलाकॉलनी जलकुंभावरुन १८ टँकर भरले जातात.

दरम्यान टॅंकर कंत्राटदार अभिजित थोरात यांनी विहीरीच्या पाण्याला नागरिक विरोध करीत आहेत. नागरिकांच्या विरोधामुळे आम्ही टँकर बंद केले आहेत. विहिरीचे पाणी टँकरव्दारे नागरिकांना द्यायचे असेल तर महापालिकेचा एक अधिकारी किंवा कर्मचारी सोबत द्या असे महापालिका प्रशासनाला कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com