
औरंगाबाद - विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने वेळोवेळी उपाय सुचविले होते; परंतु प्रत्यक्षात ओझे कमी करण्यात फारसे यश आलेले नाही. कोवळ्या वयात खांद्यावरील दप्तराच्या वजनामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखी व मानदुखीसह इतर त्रासांना तोंड द्यावे लागत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
पाठीवर सततच्या वजनामुळे विद्यार्थ्यांची लहानपणापासून उभे राहण्याची पद्धतही बदलते. दप्तराच्या ओझ्यापासून मुलांची एक दिवस सुटका व्हावी, म्हणून गारखेडा परिसरातील छत्रपती प्राथमिक शाळेत रामदास वाघमारे हे शिक्षक दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरवीत आहेत.
पहा - "परीक्षेला सामोरे जाताना...video
खडू, फळा, पाटी-पेन्सिल, वही-पेन याशिवाय आपण अभ्यास करू शकत नाही, मात्र छत्रपती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे. या वस्तूंच्या आधारे विद्यार्थी आपला अभ्यास पूर्ण करतात. या वस्तू तयार करण्यासाठी कचऱ्यात पडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, झाकण, पिस्त्याची टरफले, काडेपेटी, आइस्क्रीमच्या काड्या, विविध झाडांच्या बिया, लाकडी ठोकळे, तारा, बटने अशा अनेक गोष्टींपासून अभ्यासपूर्वक शैक्षणिक विज्ञान, मराठी, गणितीय सूत्रे तयार करण्यात आली आहेत.
आश्चर्य वाचा - आम्ही अंभईचे, निघाले मुंबईचे... बारावीच्या परीक्षेतील प्रकार
तसेच शाळेच्या परिसरात विविध झाडांवर मातीचे भांडे ठेवण्यात आले आहे. या मातीच्या भांड्यात विद्यार्थी पक्ष्यांसाठी पाणी, धान्य ठेवतात. त्यामुळे अनेक पक्षी शाळेच्या आवारात गर्दी करतात. यामुळे मुलांना झाडे, वेली, पशू, पक्षी यांचा अभ्यास करता येतो. या उपक्रमासाठी शाळेचे शिक्षक रामदास वाघमारे प्रयत्नशील असतात. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारदेखील मिळाला आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी मी शाळेत हा उपक्रम सुरू केला. यासाठी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित केले. शाळेत विविध खेळांच्या माध्यमातून लेझीम पथक, हलगी वाजवून विद्यार्थ्यांना लेझीमचे धडे दिले. टाकाऊ वस्तूंतून टिकाऊचा अभ्यास आगळावेगळा आहे. निरनिराळे प्रयोग करताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान मिळते.
- रामदास वाघमारे, शिक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.