esakal | जिल्हा परिषदेच्या बैठकीसाठी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सी  
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी (ता. नऊ) आयोजित करण्यात आली. ही बैठक झूम अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे घेण्यात आली. बैठकीत कुणी घरून तर कोणी पंचायत समिती कार्यालयातून सहभागी झाले. 

जिल्हा परिषदेच्या बैठकीसाठी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सी  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद, ता. ९ : लॉकडाऊनमुळे काळात जिल्हा परिषद सदस्यांसह पदाधिकारीही घरीच आहेत. अधिकारी मात्र सोशल डिस्टन्सींग पाळून काम करत आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी (ता. नऊ) आयोजित करण्यात आली. ही बैठक झूम अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे घेण्यात आली. बैठकीत कुणी घरून तर कोणी पंचायत समिती कार्यालयातून सहभागी झाले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या दालनातून जिल्हा परिषद अध्यक्षा मिना शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव शिरीष बनसोडे सहभागी झाले. तसेच आरोग्य सभापती अविनाश बलांडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनातून तर बांधकाम सभापती किशोर बलांडे, सदस्य शिवाजी पाथ्रीकर यांनी फुलंब्री, मधुकर वालतुरे यांनी गंगापूर, किशोर पवार यांनी कन्नड, केशवराव तायडे पाटील यांनी सिल्लोड पंचायत समिती कार्यालयातून सहभाग नोंदवला. समाज कल्याण सभापती मोनाली राठोड, सदस्य रमेश गायकवाड, रमेश पवार, जितेंद्र जैस्वाल यांनी घरून सहभाग घेतला. 

कोरोना संदर्भात उपाय-योजनांवर चर्चा 
बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय-योजना करण्यावर भर दिला. त्यात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना औषधी पुरवठा करावा. आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, मास्क उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी सदस्यांनी केली दोन-तीन दिवसांत या वस्तू पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन सभापती गलांडे, डीएचओ डॉ. गिते यांनी दिले. कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी अत्यावश्यक औषधी, सिरप तत्काळ खरेदी करून उपकेंद्रावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा